Manohar Joshi Passed Away: बाळासाहेबांचं एक पत्र अन् मनोहर जोशींनी झटक्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला!

Manohar Joshi Passed Away: मुख्यमंत्री कोणीही असला तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच असेल, असं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away esakal
Updated on

Manohar Joshi Passed Away

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दाखल करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी रोजी जेव्हा 86 वर्षीय मनोहर जोशी यांची प्रकृती खालावू लागली तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेले. आयसीयूमधील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. शुक्रवारी पहाटे ३.०२ वाजता त्यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति असलेल्या निष्ठेचे किस्से आजही चर्चेत आहेत.

असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १९९९ चा काळ होता. त्यावेळी शिवसेना-भाजपा युतीचं सरकार राज्यामध्ये होतं. खरंतर प्रादेशिक पक्षाकडे एखाद्या राज्याची सत्ता आली की त्या पक्षाचे प्रमुखच मुख्यमंत्री होतात, पण त्यावेळी असं काही नव्हतं. शिवसेना प्रमुखांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याऐवजी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं, तर भाजपाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते.

पण ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, तसंच मनोहर जोशी यांनीही अचानक राजीनामा दिला होता. १९९५ साली भाजपा व शिवसेना युतीचं सरकार आलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मला ऊठ म्हटलं की उठणारा व बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे. मुख्यमंत्री कोणीही झालं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहणार, असंही काही ठिकाणी उल्लेख आहे.

Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi: मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना

'वर्षा-मातोश्री'मधील तणाव

युतीतील भाजपा व शिवसेनाप्रमुख यांना सांभाळत काम करताना मनोहर जोशींना संघर्ष करावा लागत होता. यामध्ये त्यांचे शिवसेनाप्रमुखांशी अधूनमधून खटकेही उडत होते. एन्रॉन प्रकल्पासाठी त्या कंपनीच्या भारतातल्या प्रमुख रिबेका मार्क जोशींना भेटायला येणार होत्या. पण त्या उशिरा आल्याने जोशींनी संतापून बैठक रद्द केली. पण त्यावेळी रिबेका या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर चर्चा करत होत्या.

Manohar Joshi Passed Away
Loksabha Election : आप-काँग्रेसचा 'या' तीन राज्यांत आघाडी करण्याचा निर्णय

या वादाबद्दल 'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या घटनेतून विपरित अर्थ काढण्यात आला आणि रिबेका बाळासाहेबांना भेटल्या म्हणून मनोहर जोशी संतापले असं त्यांना सांगण्यात आलं. त्यातून वादाची ठिणगी पडली. (Latest Marathi News)

पुढे जयदेव ठाकरेंच्या घरावर छापा, रमेश किणी मृत्यू प्रकरण, भूखंडांचं आरक्षण बदलणं या सगळ्या वादग्रस्त प्रकारांमुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला. त्यांच्यानंतर नारायण राणे यांच्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्याचा प्रस्ताव ठेवला.

त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना राजीनामा देण्याची मागणी करणारं पत्र पाठवलं. त्यानंतर मनोहर जोशी यांनी राजीनामा दिला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले.

काय लिहिलं होतं पत्रामध्ये?

प्रिय मुख्यमंत्री,

तुम्ही आत्ता जिथे असाल, तिथे सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.

(संदर्भ - BBC Marathi)

Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed Away: राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन; शिवसेनेचा सभ्य अन् सुसंस्कृत चेहरा हरपला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()