संभाजी भिडेंच्या 32 मण सुवर्ण सिंहासनातले 32 मण म्हणजे नेमके किती?

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं.
Chhatrapati Shivaji Maharaj 32 Man Sinhasan
Chhatrapati Shivaji Maharaj 32 Man SinhasanSakal
Updated on

सांगलीमधील शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या विविध वक्तव्यावरून नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे अनुयायी संपूर्ण राज्यभरात पसरलेले आहेत. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याच्या एकमेव उद्देशाने  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य चालवलं जातं असं संभाजी भिडे यांचं म्हणणं आहे. त्यांनी काही वर्षांपासून रायगडावर शिवाजी महाराजांचं ३२ मण सुवर्णसिंहासन बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून निधी गोळा केला जात आहे. पण ३२ मण सुवर्ण सिंहासनामधले ३२ मण म्हणजे किती आहे आपल्याला माहिती आहे का?

६ जून १६७४ रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांच्या हातात स्वराज्याची सूत्रे आली. संभाजी महाराजांच्या निधनानंतर कालांतराने पेशव्याच्या हातात स्वराज्याचे सूत्रे आल्यावर या सिंहासनाविषयी जास्त नोंदी आढळत नाहीत. आणि १८१८ साली इंग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला तेव्हाही त्यांनी सोन्याच्या सिंहासनावर कब्जा केल्याच्या कोणत्याच नोंदी इतिहासात आढळत नाहीत पण संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा संकल्प केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Sakal

काय आहे शिवाजी महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास?

महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. पोलादपूरच्या रामजी दत्तो चित्रे यांनी हे सिंहासन त्याकाळी घडवलं होतं. त्यासाठी अत्यंत मौल्यवान रत्ने सिंहासनासाठी वापरली गेली होती. महाराजांच्या निधनानंतर त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याविषयी जास्त नोंदी आढळत नाहीत.

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Sakal

३२ मण म्हणजे किती किलो?

सध्या जसे वजन मोजण्यासाठी ग्रॅम या मापकाचा वापर होतो तसा तेव्हा शिवाजी महारांच्या काळात मण किंवा शेर या मापकात वजनाचे मापण केले जायचे. १६ शेर म्हणजे १ मण असं माप असायचं. १ शेर म्हणजे २४ तोळे आणि १ तोळा म्हणजे ११.७५ ग्रॅम. म्हणून

१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोळे = २८२ ग्राम होते.

१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.

असे ३२ मण = ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो)

३२ मण = १४४ किलो

पण काही ठिकाणी १ मण म्हणजे ४० किलो असाही उल्लेख आढळतो. ४० किलोच्या अंदाजाने हिशोब केला तर ३२ मण म्हणजे १२८० किलो असाही हिशोब येतो. पण इतिहासकालीन नोंदीनुसार ३२ मण म्हणजे १४४ किलो असा उल्लेख आपल्याला आढळतो.

शिवाजी महाराजांचं सिंहासन हे १४४ किलो सोन्यापासून बनवलेलं होतं. त्यानंतर आता रायगडावर परत १४४ किलो सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी संकल्प करण्यात आला असून लोकांच्या सहभागातून आणि वर्गणीतून बनवलं जाणार आहे. त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.