भयानक काळोख! लाईट गेली अन् दीड तास मृत्यूशी झुंज!  सभामंडपाखाली दबलेल्या ‘लक्ष्मण’ने सांगितला थरार

Paras accident
Paras accident
Updated on

अकोला : पहिल्यांदा देवाजवळ गेल्यानंतर ‘गुण’ आल्याने नियमित देवाचे येऊन दर्शन घेईल, असा नवस केला. त्यासाठी दहा आठवडे सतत देवाच्या दारी आलो अन् रविवारच्या (ता. ९) रात्री देवाची पुजा करतानाच टिनाचे सभामंडप कोसळले. त्यात शेकडो लोक दबले. सोसाट्‍याच्या वाऱ्यात कडुलिंबाचे झाड अचानक कोसळल्याने टिनाच्या सभामंडपाखाली जवळपास दीड तास गुदमरत राहिलो. शेवटी लोकांनी बाहेर काढल्याने जीव वाचला, असा थरारक प्रसंग पारस येथील घटनेचे प्रत्यदर्शी जखमी साक्षीदार लक्ष्मण बुटे (वय ४५, रा. कार्ला बोचरा, अंजनगाव सुर्जी) यांनी ‘सकाळ’ला सांगितला.

बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी (ता. ९) रात्री दुर्दैवी घटना घडली. रात्री ७.३० वाजता मंदिरात आरती सुरू असतानाच आकाशात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस सुरु झाला. या भयानक स्थितीत रात्रीच्या काळोखात अचानक विज पुरवठा खंडित झाल्याने मंदिर परिसरातील सर्वच लोकांनी सभामंडपाचा आश्रय घेतला. सभामंडपात शेकडो भाविकांची गर्दी जमलेली असतानाच अचानक जवळच असलेले कडूलिंबाचे झाड सभामंडपाच्या टिनपत्र्यांवर कोसळले. त्यामुळे टिनपत्र्यांखाली उभे व बसलेले भाविक किड्या माकोड्या सारखे दबले. यावेळी महिलांसह लहान मुलांचा रडण्याचा आवाज व आकाशातले तूफान यामुळे सर्वकाही इथच संपल्यासारखे वाटले.

टिन पत्र्यांखाली दबल्यानंतर श्वास कोडला. पूर्ण शरीरासह हातपाय थंडे पडले. तब्बल दीड तास सभामंडपाखाली गुदमरल्याच्या स्थितीत असतानाच गावातील नागरिक व इतरांनी टिनपत्रे काढली.  त्यामुळे कोंडलेला श्वास मोकडा झाला व कसातरी जीव वाचला. या काळरात्रीचा १५ वर्षाचा मुलगा सुद्धा साक्षिदार झाला. त्याचाही जीव वाचला. त्यानंतर दुर्घटनेच जखमी झालेल्या इतर लोकांसोबत वाहनाने अकोल्यातल्या सरकारी दवाखान्यात पोहचलो. डॉक्टरांनी इजाल केल्याने सकाळपासून नवे जीवन मिळाल्यासारखे वाटत आहे, अशी आपबीती मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लक्ष्मण बुटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली.

दरम्यान पारस येथील दुर्घटनेमुळे लक्ष्‍मण बुटे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून डोक्याला सुद्धा मार लागला आहे, तर त्यांच्या १५ वर्षाच्या मुलाला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सर्वोपचारमध्ये उपचार सुरु आहे.


लग्नापूर्वी देवदर्शनाला आली अन् मृत्यूच्या तोंडातून सुटली -


आरती बाबुलाल रंगसिंगे (वय १८, रा. मोरगाव, जलंब, जि. बुलढाणा) हीचे ३० एप्रिल रोजी लग्न असल्याने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी रविवारी (ता. ९) देवदर्शनाला आजी कौशल श्यामराव इंगळे सोबत आली. देवाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर पाऊस व वाऱ्यापासून बचावासाठी सभामंडपात गेली. तिथं झाड कोसळल्याने टिनाच्या खाली आजी कौशल इंगळे दबली. आजीचा डोळ्याला व डोक्याला तीन-तीन टाके लागले, तर आरतीच्या हनुवटी व पायाला लागले. काळरात्री मृत्यूच्या तोंडातून आजी व मुलगी बाहेर आली, अशी आपबीती आरती रंगसिंगे या मुलीच्या आईने सांगितली.

Paras accident
Mumbai University : उद्या परीक्षा अजून हॉल तिकीटही नाही, विद्यापीठाचा कारभारावरून आदित्य ठाकरे संतापले!

डोक्यावर २५ टाके पण जीव वाचला

 
लता गुलाब तायडे (वय ५५, रा. वानखेड पातुर्डा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) या रविवारी (ता. ९) पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आल्या. देवाची पूजा केली. तितक्यात पाऊस सुरु झाल्याने मुलासह सभामंडपाचा आश्रय घेतला. परंतु त्याच वेळी अचानक झाडासह टिन कोसळल्याने २१ वर्षाच्या मुलाचे डोके फुटले. खांद्याला सुद्धा मार लागला. परंतु मुलाच्या वेदनांपूळे आईने स्वतःच्या वेदना लपवल्या. शेवटी टिनातून बाहेर निघाल्यावर सर्वोपचार रुग्णालयात आल्या. यावेळी लता तायडे यांच्या डोक्याला २५ टाके लागले. डोक्यावर ॲंगल पडल्याने ही गंभीर दुखापत झाल्याची माहिती लता तायडे यांनी दिली.

टिन पडल्याने मानही उचलेना

 
पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात देवाचे दर्शन घेतल्यावर वारा, पावसापासून बचावासाठी सभामंडपात लोकांची गर्दी झाली. त्यामुळे पावसापासून बचावासाठी सभामंडपाचा आश्रय घेतला. परंतु तेच कोसळून डोक्यावर पडल्याने शांताबाई तामसकर (वय ७०, रा. तामशी बटावाडी, वाडेगाव, जि. अकोला) यांना गंभीर दुखापत झाली. उतार वयातच मानेला गंभीर दुखापत झाल्याने आता शांताबाईंना मानही उचलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त पाय व छातीसह कंबरेला सुद्धा गंभीर मार लागल्याचे शांताबाईंनी सांगितले.

Paras accident
Paras Accident: पारसमध्ये मृत्यू झालेले ते ७ जण आले होते अघोरी उपचारांसाठी ; अंनिसचा धक्कादायक दावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.