Raj Thackrey: राज ठाकरे अचानक भाजपच्या विरोधात कसं बोलू लागले?

राज ठाकरेंचं अन् भाजपचं बिनसलं? कर्नाटकातील निवडणूकीवरुन दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
Raj Thackrey
Raj ThackreyEsakal
Updated on

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा मोठा पराभव केला आहे. काँग्रेसने 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची मिळवला आहे. या पराभवासह भाजपाला दक्षिणेतील एकमेव राज्यही गमवावं लागलं आहे. तर काँग्रेसच्या हातात 10 वर्षांनी सत्तेच्या चाव्या जनतेने दिल्या आहेत. दरम्यान या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपावर सडकून टीका केली आहे.

"मी एका भाषणात विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो तर सत्ताधारी पक्ष हारत असतो असं म्हटलं होतं. हा स्वभावाचा, वागणुकीचा परिणाम आहे. आपलं कोण वाकडं करु शकतं अशा विचारांचा हा पराभव आहे. जनतेला, कधीही गृहित धरु नये. या निकालातून सर्वांनी हे बोध घेण्यासारखं आहे," अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. कर्नाटकमधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिमाण असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

Raj Thackrey
Ajit Pawar: 'तेव्हापासूनच त्यांना भाजपमध्ये यायचं होतं', शिंदे गटाच्या दाव्यानं अजितदादा अडचणीत?

तर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर देताना राज ठाकरे यांना लक्ष केलं आहे. आशिष शेलार बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्या बोलण्याला प्रतिक्रियेला आम्ही महत्व देत नाही. राज ठाकरे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतात असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील हे टीका करणं पहिल्यांदाच चर्चेचा विषय ठरलं आहे.

Raj Thackrey
Cabinet Expansions: येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळाचा विस्तार? 20 आमदार होणार मंत्री

गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे आणि भाजप आगामी निवडणुकांसाठी युती करतील अशा चर्चा सुरू होत्या. भाजप आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठीही चालू होत्या. अशातच आता ही पक्षाला आणि निवडणुकीत मिळालेली हार यावरून राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली तर त्या टीकेला शेलार यांनी उत्तर दिलं त्यामुळे भाजप आणि राज ठाकरे यांच्यात काही बिनसलं आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मिडियावर दिसून येत आहेत.

Raj Thackrey
Maharashtra Politics: त्या घटनेसंदर्भात भाजप नेता स्पष्ट बोलला; राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.