Liquor License : दारू पिण्यासाठीही लागतं लायसन्स; कसं मिळवायचं? जाणून घ्या एका क्लिकवर

दारू पिणे, खरेदी करणे आणि सोबत बाळगण्यासाठी परवाना लागतो, हेच अनेक जणांना माहित नसेल.
-Alcohol-car.jpg
-Alcohol-car.jpgSakal
Updated on

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण मद्यप्राशनाला प्राधान्य देतात. तुम्हाला जर मद्य खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला परवाना आवश्यक आहे हे तुम्हाला माहित आहे का?

हा परवाना कसा मिळवायचा, याविषयीची सविस्तर माहिती खाली देत आहोत. दारूसाठी तीन ते चार प्रकारचे परवाने असतात. एका दिवसासाठीचा, आठवडाभरासाठीचा, वर्षभरासाठीचा आणि कायमचा परवाना.

-Alcohol-car.jpg
New Year 2023: पुणेकरांचा थर्टी फस्ट यंदा जोरात; 'वन डे परमिट'साठी लाखो परवाने

कायमचा परवाना कसा मिळवाल?

१. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर जा.

२. त्यानंतर "New User? Register Here" हा पर्याय निवडा.

३. तिथे Create an Account हा पर्याय निवडा.

४. त्यानंतर लॉगिन करा आणि खालील क्रमाने पर्याय निवडा.

Home Department> Sub Department > State Excise Department

-Alcohol-car.jpg
New Year Celebration : न्यू इयर दणक्यात सेलिब्रेट करायचे असेल तर आजच दिल्लीची ट्रेन पकडा!

५. त्यानंतर Permit for purchase, possession, transport, use and Cosumption of Foreign liquor and country liquor in the state of Maharashtra या पर्यायावर क्लिक कर.

६. त्यानंतर तुम्ही exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जाल. तिथे गेल्यावर F.L X-C या पर्यायावर क्लिक करा, तुमची माहिती भरा आणि Submit करा.

७. त्यानंतर तुमचा फोटो, सही, आधार कार्ड अपलोड करा आणि Submit करा.

८. अर्जाचा क्रमांक तुम्हाला मिळाल्यानंतर शेवटच्या स्टेपला तुम्हाला पैसे भरावे लागतील.

९. त्यानंतर काही दिवसांमध्ये याच वेबसाईटवर तुम्हाला ओळखपत्राप्रमाणे तुमचा कायमस्वरुपी परवाना मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()