HSC Result 2023: बारावीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? फोटोकॉपी साठी मुदत किती? जाणून घ्या सर्व माहिती

बारावीचा निकाल येथे पहा
HSC Result 2023
HSC Result 2023google
Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (ता. २५) दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांनी येथे पहावा निकाल

- mahresult.nic.in

- https://hsc.mahresults.org.in

- http://hscresult.mkcl.org

HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीच्या निकाल घटला! राज्यात तब्बल ९१.२५ टक्के विद्यार्थी यशस्वी

या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. ‘www.mahresult.nic.in’ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध असणार आहे.

HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर; निकालाचे सर्व अपडेट पहा एका क्लिकवर

बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयांच्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘http://verification.mh-hsc.ac.in’ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी आणि गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीच्या निकाल घटला! राज्यात तब्बल ९१.२५ टक्के विद्यार्थी यशस्वी

हे लक्षात ठेवा

गुणपडताळणी : २६ मे ते ५ जूनपर्यंत

छायाप्रतीसाठी : २६ मे ते १४ जूनपर्यंत

गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्र वितरण : ५ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.