NCP crisis : अजित पवारांसाठी दार खुलं आहे का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुटुंबासाठी...

Ajit Pawar and Supriya Sule
Ajit Pawar and Supriya Sule
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) बंड घडवून आणत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहे. सत्तेत सामील होऊन आता महिन्याभराहून अधिक काळ उलटला आहे. त्याचवेळी दोन शदर पवार गट आणि अजित पवार गटात कोणतेही मतभेद असल्याचं दिसून आलं नाही. मात्र राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटांमधील घडामोडींवर मित्रपक्ष सावध झाले आहे. या संपूर्ण घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक बाबींवर भाष्य केलं आहे.

Ajit Pawar and Supriya Sule
आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट, शिंदे गटाकडून ६ हजार पानी उत्तर दाखल; निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार गटाशी त्यांचा लढा वैचारिक आहे. मात्र एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. अजित पवार यांच्यामुळे पक्षात फूट नाही, असं तुम्हाला वाटतं का, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,घडलेल्या घटना माझ्यासाठी खूप दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. आता हा विचारधारेचा संघर्ष आहे. मी माझी निवडणूक भाजपच्या विरोधात लढले. मात्र जेव्हा आमच्या पक्षातील काही लोक असा निर्णय घेतात आणि पक्ष विस्कळीत होतो, ते दुर्दैवीच आहे. होय… हे एक भावनिक विभाजन आहे. शेवटी, राजकारण हे धोरणे आणि विचारसरणीचे असते. राजकारण काही नोकरी किंवा व्यावसाय नाही, की आवडलं नाही, तर तिकडं जावं, असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

अजित पवारांनी भाजपसोबत जाणं अनपेक्षित होत का, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला वाटत नाही की भाजपसोबत जाण्याचं काही विशेष कारण असेल. फुटलेल्या गटाकडून कोणतेही आरोप करण्यात येत नाही. भाजपशी हातमिळवणी करायची की नाही हा एकच प्रश्न होता. पक्षाच्या काही सदस्यांना ते योग्य वाटलं, तर आम्हाला ते योग्य वाटत नाही.

Ajit Pawar and Supriya Sule
Bacchu Kadu : कोणी नाराज झालं तर त्याची मला परवा नाही, शेतकरी मरत आहे पण..; बच्चू कडूंचा कोणावर प्रहार?

दरम्यान भाजपकडून राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. यावेळी भाजपने आपली रणनीती बदलत ठेवली. सुरुवातीच्या दोन अपयशानंतर, तिसऱ्यांदा भाजपने मोठी योजना केली. भारताच्या राजकारणात विचारसरणीचा मुद्दा कमकुवत होच चालला आहे. हे दुर्दैव आहे. प्रसारमाध्यमं म्हणतात की याचं कारण सत्ता असू शकतं, कोणी म्हणतं विकास, काहींना वाटत केंद्रीय संस्था, यापैकी काहीही असू शकतं. मात्र यावर भाजपच चांगलं उत्तर देऊ शकतं, असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

अजित पवारांना परतीचा मार्ग खुला आहे का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अर्थात हे सर्व खूप निराशाजनक आहे. मात्र संवाद म्हणजे, त्यांना परत येण्याची परवानगी आहे, असं नाही. ते परत येईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही. मात्र आमच्याकडून कुटुंब अबाधित ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतील.

कुटुंबात राजकारण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांनी लोकशाहीत मिळालेल्या अधिकारानुसार, आपला मार्ग निवडला आहे. आमच्यात राजकीय लढाई का व्हावी? असा प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी ही वैचारिक लढाई असल्याचं म्हटलं. आम्ही एक कुटुंब असू, पण वैचारिकदृष्ट्या एकमेकांविरुद्ध लढू, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.