Devendra Fadnavis: मी पुन्हा येईन! देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री! लाडकी बहीण अन्‌ शेतकऱ्यांची महायुतीलाच पसंती

Assembly Election Result: राज्याच्या विधानसभेचा निकाल आता जवळपास हाती आला आहे. भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरेल, अशी सद्य:स्थिती असून दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यांचा सहयोगी पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील ३८ जागांवर आघाडीवर आहे. सध्याची स्थिती पाहता भाजपचा मुख्यमंत्री फिक्स असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे.
Devendra Fadnavis
bjp leader devendra fadanvis mi punha yein video deleted by bjp Maharashtra knp94sakal
Updated on

सोलापूर : राज्याच्या विधानसभेचा निकाल आता जवळपास हाती आला आहे. भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरेल, अशी सद्य:स्थिती असून दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यांचा सहयोगी पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील ३८ जागांवर आघाडीवर आहे. सध्याची स्थिती पाहता भाजपचा मुख्यमंत्री फिक्स असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे. या निवडणुकीत महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तरुणांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व वृद्धांसाठी योजना आणि शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव हे मुद्दे फार निर्णायक ठरले आहेत.

२०१४ ते २०१९ या काळात राज्याचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ नंतर अडीच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणूनही यशस्वी काम केले. राज्याला पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री पाहिजेत, अशी भावना जनतेची होती. मात्र, त्यांना विरोधात बसावे लागले. तरीदेखील त्यांनी हार मानली नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना घेवून सरकार बनविले. त्यात मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले.

आता त्यांच्या सरकारने केलेली कामगिरी, योजना पाहून शेतकरी, महिला, तरुण-तरुणींसह वृद्ध मतदारांनी महायुतीलाच पसंती दर्शविली. आता भाजप सर्वात मोठा पक्ष राहिल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. पक्षश्रेष्ठीकडून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचा कारभार फडणवीस यांच्या हाती जाणार हे निश्चित मानले जात आहे.

सोलापुरात भाजपचे ५ आमदार फिक्स

सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख पाचव्यांदा आमदार होत आहेत. शहर मध्यमध्ये पहिल्यांदाच देवेंद्र कोठे आमदार होतील. दक्षिण सोलापुरातून सुभाष देशमुख हे हॅट्रिक साधतील. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी दुसऱ्यांदा विजयी होतील. पंढरपूर-मंगळवेढ्यात समाधान आवताडे आघाडीवर आहेत. तर माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर व विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली होती. याचा मोठा फायदा आमदारांना झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सध्याचा कल

  • भाजप : १२४ ते १२६

  • शिंदे सेना : ५६

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ३६ ते ३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.