पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल, त्याला ५० हजारांचे मताधिक्य देणार आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात (Sawantwadi Constituency) शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार, असाही प्रचार काहींनी केला. हा गैरसमज दूर होण्यासाठी मी २०२४ ची विधानसभाच लढविणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
त्यांनी मतदारसंघातील विकासकामे पूर्ण झाल्याचा दावाही केला. केसरकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांतील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले; मात्र आम्ही गाव पॅनेल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो.
खानोली व मातोंडमध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली. त्यामुळे आमच्याकडे ग्रामपंचायत नाही, असा प्रचार करणे चुकीचे आहे. मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार, असाही प्रचार काहींकडून करण्यात येत आहे; मात्र त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी मी २०२४ मध्ये आमदारकीच लढवणार आहे. पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल, त्याला ५० हजारांचे मताधिक्य देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील शाळांमध्ये नियुक्त निवृत्त शिक्षकांना मानधन मिळाले नसल्याबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले असता, संबंधित शिक्षकांना तत्काळ मानधन देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.