मी आमदार झाल्याशिवाय मरणार नाही. असं वक्तव्य नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविंद्र डोंगरदेव यांनी केलं आहे. (I will not die without becoming an MLA Statement of Nagpur Independent Candidate Ravindra Dongardev )
शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे निकाल आज हाती येणार असून नागपूर, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या पाच मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविंद्र डोंगरदेव यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Live Blog: कॉंग्रेसला धक्का; युवा नेता मानस पगारचे अपघातात निधन
'आमदार झाल्याशिवाय रवींद्र डोंगरदेव मरणार नाही हे लक्षात ठेवा. मी सुरुवात कमी वयात केली आहे. नक्कीच आयुष्यात यशस्वी होणार. मी वेळेत सुरुवात केली. चांगली सुरुवात अर्ध यश असतं. पुढच्या वेळी रवींद्र डोंगरदेव आमदार असणारच.' असा विश्वास डोंगरदेव यांनी व्यक्त केला आहे.
डोंगरदेव हे शिक्षक आजच्या युगातही सर्वांना न चुकता पत्रं पाठवित असतात. आणि पत्रांद्वारे त्यांचा जनसंपर्क इतका वाढला आहे की त्यांनी त्यांच्या निवडणूकीचा प्रचार पत्रांद्वारेच केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.