Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईचा मुळशी पॅटर्न! पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावले... Video Viral

Video Viral : जमीन बळकावण्याच्या त्यांच्या या प्रकाराला जेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांवर दबाव आल्याने त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Pooja Khedkar
Pooja Khedkar esakal
Updated on

पुणेः वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे कमी होत नाहीत तोच आता त्यांच्या आईने मुळशी तालुक्यामध्ये पिस्तुलचा धाक दाखवून नागरिकांना धमकावल्याचं प्रकरण पुढे येत आहे. धडवली गावातला एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Pooja Khedkar
Hina Khan: "तुम्ही देवाला माझ्यासाठी साकडं घातलं..." ; चाहत्यांचे आभार मानताना हिना झाली भावूक

जमीन बळकावण्याच्या त्यांच्या या प्रकाराला जेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांवर दबाव आल्याने त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या खेडकर कुटुंबावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान, पूजा खेडकर यांची पुण्यातून बदली झाल्यानंतर त्या गुरुवारी वाशिममध्ये हजर झाल्या. त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांची भेट घेतली. मीडियातून होत असलेल्या आरोपावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. ''आरोपाबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराईज नाही.'' एवढंच स्पष्टीकरण पूजा खेडकर यांनी दिलं. ''वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे.. पुढील वर्षभर काम करत राहीन.'' असंही खेडकर म्हणाल्या.

Pooja Khedkar
RBI: मुख्य गुंतवणूक कंपनी बनणार जिओ फायनान्शियल; रिझर्व्ह बँकेकडून मिळाली मंजुरी, शेअर्समध्ये मोठी वाढ

पूजा खेडकर यांनी प्रशिक्षणार्थी कालावधीत असताना अधिकाऱ्यांकडे अनेक डिमांड केल्या होत्या. दुसरीकडे त्यांनी अपंग व्यक्तीच्या कोट्यातून नियुक्ती मिळवल्याचं पुढे येतंय. तसेच, त्यांनी ओबीसी नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचं सांगण्यात येतंय. पूजा खेडकर यांचे वडील हे प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त सरकारी अधिकारी होते. नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचा पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.