Tukaram Munde: प्रतीक्षा कधी संपणार? तुकाराम मुंडे अजूनही वेटींगवरच!

आरोग्य विभागाचा कार्यभार काढून त्यांना पुन्हा नियुक्तीच्या प्रतीक्षेत
Tukaram Munde News
Tukaram Munde NewsEsakal
Updated on

Tukaram Munde News: राज्यात अधिकाऱ्यांची बदली होतच असते पण एक असं व्यक्तिमत्व जे फक्त त्यांच्या बदलीसाठी खास करून ओळखलं जातं ते म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात त्यांची बदली हा चर्चेचा विषय राहिला आहे. आत्तापर्यत 16 वर्षात 20 वेळा बदल्या झालेले एकमेव अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 

आयएएस आधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीला महिना उलटूनही त्यांना नवी पोस्टिंग मिळाली नाही. तुकाराम मुंडे यांची आरोग्य विभागातून बदली होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, अद्याप त्यांना नवे पोस्टींग देण्यात आली नाही.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विशेष आग्रहामुळे मागील महिन्यामध्ये तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

तुकाराम मुंडे दोन गोष्टींमुळे चर्चेत असतात. एक म्हणजे काम करण्याची त्यांची पद्धत शिस्त, आणि दुसर म्हणजे त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या.

आरोग्य विभागामध्ये शिस्त आणून चांगल काम करू पाहणाऱ्या तुकाराम मुंडे यांची बदली करण्यामागे आरोग्य विभागातील आधिकाऱ्यांची लॉबी तसेच आरोग्य विभागातील कंत्राटदारांचे हितसंबंध आहेत, अशा चर्चा सुरू आहेत.

Tukaram Munde News
Maharashtra Politics : राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले; ठाकरे गटाला भलताच संशय

दरम्यान तुकाराम मुंडे यांना नवे पोस्टींग मिळणार की त्यांना पुन्हा वेटींगवरच राहावे लागणार याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कोरोना काळामध्ये इमर्जन्सीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी खरेदी करण्यात आल्या. यामध्ये अनेक आधिकाऱ्यांचे खिशे भरले. यात कंत्राटदारांनी मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.

मविआ सरकारच्या काळामध्ये तुकाराम मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले. राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर आणि सरकार बदलल्यानंतर मुंडे यांना आरोग्य विभागातील महत्वाचे पद देण्यात आले आहे.

Tukaram Munde News
Kasba Election : 'कसबा झालाय भकास...', पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून पुण्यात पोस्टरबाजी

त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी लागलीच कामाला सुरवात केली. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयांची पाहणी करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.

काम करताना त्यांनी स्वत:च्या कामाच्या पद्धतीमध्येही थोडा बदल केला. कोणत्याही आधिकारी वा कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई न करता ताकीद देऊन कामात सुधारणा करण्याची संधी दिली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यास सुरवात झाली. परंतु अजूनही त्यांचा वनवास संपलेला नाही.

मुंढेच्या बदलीचा विक्रमच

सरकार कोमतेही असले तरी तुकाराम मुंढेच्या कार्यशैलीत बदल होत नाही. त्यामूळे झटक्यात निर्णय घेतल्याने अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहे. त्यामूळे मुंढे यांना वेळोवेळी बदलीला सामोरे जावे लागले आहे. मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहे.

गेल्या 16 वर्षांच्या सेवेत मुंढेंची 20 पेक्षा जास्त वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांची प्रशासनात ओळख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()