IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांची उलटी गिनती सुरु? पोलिसांकडून 3 तास चौकशी, केंद्रीय समितीही चौकशी करणार

Trainee IAS Pooja Khedkar police interrogation : रात्री उशिरा तब्बल तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली आहे. नेमकी कशासंदर्भात चौकशी झाली हे समजू शकलेलं नाही. पण, खेडकर यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar
Updated on

मुंबई- प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला पोलीस टीमकडून चौकशी करण्यात आली आहे. रात्री उशिरा तब्बल तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली आहे. नेमकी कशासंदर्भात चौकशी झाली हे समजू शकलेलं नाही. पण, खेडकर यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्याकडून वाशिम पोलिसांनी परवानगी घेतली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची रात्री उशिरा चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर वाशिम पोलिसांची टीम माध्यमांशी न बोलता निघून गेली. त्यामुळे ही चौकशी नेमकी कशासंदर्भात होती हे समजू शकलेलं नाही.

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar: पुण्यातील 'या' रुग्णालयातून पूजा खेडकरनं घेतलं अपंगत्वाचं चौथं प्रमाणपत्र; पिंपरी चिंचवड कनेक्शन आलं समोर

पूजा खेडकर प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र राज्यातील अनेक हॉस्पिटलमधून घेतलं आहे. नगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजारपणाबाबत प्रमाणपत्र घेतलं आहे. याशिवाय, त्यांनी पिंपरी चिंचवडमधील हॉस्पिटलमधून एक अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं आहे. त्यामुळे त्या संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.

पूजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यामधून यूपीएससी परीक्षा दिली आहे. पण, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडे ४० कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर या माजी सरपंच राहिल्या आहेत. असे असताना त्यांनी नॉन क्रिमीलेअरचा लाभ घेतला असा आरोप आहे. यावरूनही त्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाची केंद्र सरकारने देखील दखल घेतली आहे. केंद्रीय समितीमार्फत त्यांची चौकशी होणार आहे.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ;अहवाल पुन्हा पाठविण्याचा केंद्राचा राज्य सरकारला आदेश

पूजा खेडकर यांचे आई-वडील फरार आहे. त्यांच्याविरोधात शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पूजा खेडकर यांनी नावात बदल करून यूपीएससीचे प्रयत्न संपून देखील दोनवेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. एकंदरीत पूजा खेडकर या अडचणीत आहेत. येत्या काळात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.