Pooja Khedkar : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पूजा खेडकरची तक्रार; छळ झाल्याचा आरोप अन्...

, वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची परवानगी घेऊन काही माहिती देण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावलं होतं. पोलिसांची टीम पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा यांच्या मागावर आहे. जमिनीच्या कब्जावरुन शेतकऱ्यांना बंदुकीने धमकाल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
Pooja Khedkar
Pooja Khedkar esakal
Updated on

Pooja Khedkar Latest News : मागच्या आठवड्याभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई झाली आहे. तिचा प्रशिक्षण कालवधी संपुष्टात आलेला असून तिला तातडीने प्रशिक्षण केंद्रावर बोलावण्यात आलेलं आहे. मात्र इकडे पूजाने पु्ण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे.

पूजा खेडकर यांच्या घरी जे पोलिस कारवाईसाठी आले होते, त्या प्रकरणात पूजाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांची एक टीम वाशिम येथील त्यांच्या घरी पोहोचली होती. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यावेळी वाशिमच्या महिला पोलिसांची एक टीमदेखील त्यांच्या घरी दाखल झाली होती.

Pooja Khedkar
Ajit Pawar : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! पिंपरी चिंचवडच्या 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवार गटात प्रवेश होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची परवानगी घेऊन काही माहिती देण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावलं होतं. पोलिसांची टीम पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा यांच्या मागावर आहे. जमिनीच्या कब्जावरुन शेतकऱ्यांना बंदुकीने धमकाल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पूजा खेडकर यांच्या घरी तीन महिला पोलिस गेल्या होत्या. यामध्ये एक एसीपी होत्या, त्या टीमला लीड करत होत्या. सोमवारी रात्री साधारण साडेदहा वाजता वाशिम पोलिस पूजा खेडकरच्या घरी पोहोचले आणि रात्री १ वाजता बाहेर आले. पूजाची पोलिसांसोबत काय बातचित झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु तिने पोलिसांकडे पुण्याच्या डीएमविरोधात तक्रार दिल्याची माहिती आहे. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

Pooja Khedkar
Bigg Boss Marathi : कचरा टाकण्यावरून राडा ते विकास-रोहितमधील हाणामारी ; बिग बॉस मराठीच्या मागच्या सगळ्या सीजनमधील गाजलेले वाद

पुण्यात पूजा खेडकरने प्रशिक्षण कालावधीमध्ये खासगी गाडीला दिवा लावला होता, अधिकाऱ्यांवर दबाव आणून विशेष सुविधा मागितल्या, केबिन बळकावलं, शासकीय निवासस्थान मागितलं.. त्यामुळे तिची तक्रार शासनाकडे करण्यात आलेली होती. आता पूजाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार दिली आहे.

दरम्यान, पूजा खेडकरचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. अशाप्रकारची देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जातंय. Department of Personnel & Training या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीने याबाबत आदेश काढले आहेत. पूजा खेडकरला २३ जुलैपूर्वी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अॅकॅडमीला रिपोर्ट करावं लागणार आहे. राज्य सरकारने 11 जुलै रोजी दाखल केलेल्या सविस्तर अहवालानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.