IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने 23 अप्पर जिल्हाधिकारी यांना IAS बढती देण्यात आली आहे.
employee promotion
employee promotionesakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील 23 अपर जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत अर्थात आयएएसपदी बढती देण्यात आल आहे. यामध्ये एकट्या पुण्यातील 4 अधिकाऱ्यांना आयएएसचा दर्जा मिळाला आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येन 23 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्यात आली आहे.

employee promotion
Maharashtra MLC: राज्यपाल नियुक्त 12 ऐवजी 7 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब? या महत्वाच्या नावांची चर्चा

हे सर्व अधिकारी 1997 ते 1998च्या बॅचचे असून महाराष्ट्र नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारीपदी ते नियुक्त झाले होते. यामुळं प्रशासनात आता त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सचिव, महामंडळाचे प्रमुख अशा वरिष्ठ पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अधिकारीवर्गात आनंदाचं वातावरण आहे.

employee promotion
Bopdev Ghat Case Update: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात; पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

दरम्यान, दर पाच वर्षांनी आयएएस अधिकाऱ्यांच्या संख्येचा रिव्ह्यू घेतला जातो, यामुळं यंदा इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. सेवा जेष्ठता, गुणवत्ता, मागील दहा वर्षातील गोपनीय अहवाल, विभागीय चौकशी नसणे, या सगळ्या बाबी तपासून राज्य नागरी सेवा संवर्गातून भारतीय प्रशासकीय सेवेत भरती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.