महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या चांगल्याच वादात सापडल्या आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी अनेक गैरमार्गांचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा UPSC परीक्षा दिली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. यानंतर आता पूजा खेडकर यांच्या वयाबद्दल त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खेडकर या महाराष्ट्र केडरच्या ३४ वर्षीय आयएएस ऑफिसर आहेत, त्यांनी इतर मागासवर्गीय (OBC) आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) प्रवर्गांतर्गत UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच त्यांनी स्वतःला नॉन क्रिमीलेयर आणि अपंग असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला आहे.
मात्र खेडेकर यांनी त्यांचे अपंगत्व सिद्ध करण्यासाठी कोणतीही चाचणी दिलेली नाही. त्यानंतर यूपीएससीने त्यांच्या निवडीला केंद्रीय अपील न्यायाधिकरण (Central Appellate Tribunal ) समोर आव्हान दिले होते, ज्याने फेब्रुवारी २०२३मध्ये खेडेकर यांच्या विरोधात निर्णय दिला होता.
खेडकर यांचा CAT कडे २०२० आणि २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्जात, त्यांनी अपंग व्यक्तींसाठी असलेली वयाच्या कमाल मर्यादेतील सुट मिळण्याबाबतची मागणी केली होती. पण या दोन अर्जात त्यांच्या वयात फक्त एक वर्षाचा फरक दाखवण्यात आला होता. म्हणजे तीन वर्षांचा काळ लोटला असताना देखील वयामध्ये फक्त एक वर्षाची वाढ दाखवण्यात आली होती. इंडिया टुडेने यासंबंधीची बातमी दिली आहे.
इतकेच नाही थर खेडकर यांनी दोन्ही अर्जात वापरलेल्या नावांमध्ये देखील थोडासा बदल केला, २०२० साली करण्यात आलेल्या अर्जात खेडकर पूजा दिलीपराव तर २०२३ मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरण्यात आले होते.
UPSC च्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आयोगाकडून ३२ वर्षांपर्यंत सहा संधी दिल्या जातात. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयाची ३५ वर्ष पूर्ण होईपर्यंत ९ संधी मिळतात.
पूजा खेडकर यांच्या बद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत. यादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती आणि वर्तणूक यावरून त्या सध्या वादात सापडली आहेत. यानंतर आता वरिष्ठ अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील या समितीला पुढील दोन आठवड्यांत खेडकर यांचे दावे आणि पार्श्वभूमी पडताळून पाहण्याचे काम देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.