Tukaram Mundhe : कामात दिरंगाई केल्याचा तुकाराम मुंढेंवर ठपका; नियमबाह्यपणे कंत्राट दिल्याचीही तक्रार, अडचणींमध्ये वाढ

IAS officer Tukaram Mundhe
IAS officer Tukaram Mundheesakal
Updated on

Tukaram Mundhe News : धडाकेबाज निर्णय घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सुतासारखं सरळ करणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यामागे तक्रारींचं ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. दोन प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गैरकारभाचा ठपका ठेवण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी एका महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. तीन वर्षांमध्ये तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नसल्याने जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

IAS officer Tukaram Mundhe
Video : मोदींना राखी बांधायला दिल्लीत येतेय मुस्लिम बहीण; कसं जुळलं अतूट नातं?

दुसरं प्रकरण आहे कंत्राटाचं. २० कोटींचं एक कंत्राट नियमबाह्यपणे दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश माहिती आयुक्तांनी मुख्य सचिवांना दिलेत. 'साम'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कोरोना काळामध्ये तुकाराम मुंडेंनी नागपूरमध्ये कठोर उपाययोजना केल्या होत्या. अनेक अधिकाऱ्यांना खडसावले होते. त्याच काळात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंडेंची बदली झाली. नागपूरमध्ये माझ्या विरोधात काही मिळत नाही, म्हणून चारित्र्यहनन केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप तुकाराम मुंढेंनी केला होता.

IAS officer Tukaram Mundhe
Eknath Shinde : अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयातील घटनेवरून कुरघोडी करू नये; केंद्रीयमंत्र्यांचं विधान

कंत्राटदार प्रकरण आणि महिलेची तक्रार या दोन्ही नागपूरमधील प्रकरणांमध्ये तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई होते का? हे काही दिवसांमध्ये कळेलच.

तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या कृषी विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. २१ जुलै रोजी राज्यातल्या ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी विभागाची अतिरिक्त जबाबदारी मिळाली होती. भाषा विभागाचं सचिवपद मुंढेंकडेच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.