मोठी बातमी! ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबरपासून रेशनचे धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोबर, अन्यथा रेशनकार्ड रद्द होईल

बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. २३ सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील चार कोटी सदस्यांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. २३ सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील चार कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील रेशनकार्डवरील १६ लाख ३२ हजार ७८५ जणांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’चे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांली ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी, ‘ई-केवायसी’ करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. आता पुढील ३६ दिवसांत राज्यातील चार कोटी तर जिल्ह्यातील २० लाख व्यक्तींची ‘ई-केवायसी’ करून घ्यावी लागणार आहे.

‘ई-केवायसी’तून बनावट लाभार्थींचा शोध

रेशनकार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेकजण स्वस्तातील धान्य घेतात. याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमध्येच आहेत. दुसरीकडे बनावट रेशनकार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची ज्यांची नावे नोंदलेली आहेत, त्या सर्वांना ‘ई-केवायसी’ करावीच लागणार आहे. त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. पण, रेशनकार्डवरील जो कोणी सदस्य मुदतीत ‘ई-केवायसी’ करणार नाही त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल.

  • ‘ई-केवायसी’ केलेल्यांची सद्य:स्थिती

  • रेशनकार्डवरील एकूण सदस्य

  • २३,३७,८६५

  • ई-केवायसी पूर्ण केलेले

  • २,२४,०४७

  • ई-केवायसी प्रलंबित

  • ४,८१,०३३

  • ई-केवायसी न केलेले

  • १६,३२,७८५

मुदतीत ई-केवायसी करावीच लागेल

सोलापूर जिल्ह्यातील १८ लाख १२ हजार ७८० जणांनी रेशनधान्य मिळण्यासाठी ई-केवायसी करावे लागणार असून त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीणमधील ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी मुदतीत ई-केवायसी करावी, जेणेकरून त्यांचे धान्य बंद होणार नाही.

- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.