Bachchu Kadu : शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंचा इशारा

bachchu kadu and devendra fadnavis
bachchu kadu and devendra fadnavis
Updated on

मुंबई - राज्याच्या राजकारणात सातत्याने भूकंप होत असून आता आणखी एक भूंकप होणार असल्याच्या चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय देण्याच्या निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहे. यावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे.

bachchu kadu and devendra fadnavis
Crime: नाईटपार्टीमध्ये झाला गोळीबार : २३ वर्षीय मुलीचा मृत्यू!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार? या चर्चेवर बच्चू कडू म्हणाले की, असं होऊ शकत नाही. असं झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागेल. याचं कारण म्हणजे, एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी भाजपाला दिला आहे.

bachchu kadu and devendra fadnavis
Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये 'बाप्पा मोर्या रे'ने जिंकली नागरिकांची मनं

विविध समाजांकडून करण्यात येत असलेल्या आरक्षणाच्या मागणीवर आमदार बच्चू कडू म्हणाले की, सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपायला पाहिजे. तर आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. विकासाची व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे विकासावर मते मिळू शकले नाहीत. आता निवडणुकीत आरक्षणावर मते मागितली जाणार. जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.