मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या होत्या.(School Closed due to corona in maharashtra) मात्र, कोरोनाचे रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर 16 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. (School reopen again in maharashtra) परंतु, ओमिक्रॉनची (Omicron) वाढती रूग्णसंख्या अशाच पद्धतीने वाढत राहिल्यास पुन्हा एकदा बंद करण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, असे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. देशात ओमिक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. याबाबत एनएनआयने ट्वीट केले आहे. (If Omicron cases continue to rise, we may take a call to shut the schools again)
याबाबत बोलताना वर्षा गायकवाड (Varsha Eknath Gaikwad) यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवणार असल्याचे या आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या घनसोली येथील शाळेतील अठरा विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्या सर्व विद्यार्थांचे विलगीकरण करण्यात आले होते. जर ओमिक्रोनची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास आम्हाला पुन्हा शाळा बंद करण्याबाबत विचार करावा लागू शकतो असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.