Awhad Vs Fadnavis: "...तर बिचाऱ्या पोलिसांना त्रास होईल"; आव्हाडांचा फडणवीसांवर निशाणा

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना
Awhad_Fadnavis
Awhad_Fadnavis
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतचं एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरुन पोलिसांप्रती सौम्य भूमिका घेत, नाव न घेता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला आहे. (If we go to court inocent police will be suffered Jitendra Avhad targets Devendra Fadnavis)

आव्हाड म्हणाले, "माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उद्या या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. यात त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रं बनवतात"

Awhad_Fadnavis
Pune Sextortion: पुण्यातील सेक्‍सटॉर्शन प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन; मोठी माहिती आली समोर

म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. त्यामुळं या प्रकरणात काय करावं हे मला सूचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवावं,की या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्रला माहीत आहे.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

दरम्यान, गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निघालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी गर्दीतून मार्ग काढत असताना भाजपच्या एका महिला नेत्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित महिलेनं आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर ठाण्यातील विवियाना मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये मारहाण प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.