Prakash Ambedkar: राज्यात शांतता हवी असेल तर, प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा; बच्चू कडूंच मोठं विधान

मराठा आरक्षणावर चर्चा करत असताना सभागृहात त्यांनी हे विधान केलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
Updated on

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर चर्चा करत असताना सभागृहात बच्चू कडू यांनी एक मोठ विधान केलं. राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. (If you want peace in Maharashtra make Prakash Ambedkar CM big statement by Bachu Kadu)

Prakash Ambedkar
Manoranjan D: "...तर त्याला फाशी द्या"; संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाच्या वडिलांची कडवी प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा

बच्चू कडू म्हणाले, मला तर आता असं वाटतंय की या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पुज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकर यांनाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे. म्हणजे या देशाला ज्यांनी खरा न्याय मिळवून दिला ज्यांनी देशाला घटना दिली. त्यांच्याप्रती आपण एवढं तरी केलं पाहिजे. अशा पद्धतीनं समोर जायला काय हरकत आहे? का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये, असंही पुढे कडू यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Solapur Crime: शेतीच्या वादातून सोलापुरात भीषण कांड; चुलत्याचं शीर हातात घेऊन बाईकवरुन फिरत होता तरुण

सर्व कॅटेगिरीत अबकड करा

अनुसुचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे गट पाडा अशी मागणी मातंग समाज करत आहे. ओबीसींमध्ये अबकड केलं पाहिजे. कारण सुतार, कुंभार, न्हावी, लोहार समाज खूपच कमी आहे. त्यामुळं या ओबीसींमध्ये ते कुठं सापडतच नाहीत. तो संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करणार आहोत का आपण, त्यामुळं त्यांच्याही पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे, असंही पुढे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
Viral Video: मला दे मला दे! संसदेबाहेरुन चॅनेलवर स्मोक क्रॅकर दाखवण्यासाठी पत्रकारांची चढाओढ

तर कॅबिनेटमध्ये तोडफोड करा

या जगात मी पहिल्यांदाच उपोषण करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज झाल्याचं मी पाहिलं आहे. मी जरी सरकारमध्ये असलो तरी सत्य महत्वाचं आहे. ही वाईट गोष्ट नाहीए का? जबरदस्ती केली नसती तर काय फरक पडला असला.

पण ते झालं आणि त्याला तुम्ही हवा दिली, हे तपासलं पाहिजे ना? तुमच्या बाजुला गृहमंत्री बसले आणि घरं कसे पेटले असं तुम्ही म्हणता? तुमच्या बाजुला अर्थमंत्री बसत असतात आणि तुम्ही म्हणता ओबीसींना बजेट दिलं नाही. मग तुम्ही काय करत होता, अरे ठाम राहा ना. कॅबिनेटमध्ये यावरुन तोडफोड करा. ही गोष्ट कॅबिनेटमधली आहे सामान्य जनतेतील नाही, असंही बच्चू कडू यावेळी म्हणजे.

Related Stories

No stories found.