Rain Update: पावसाचा जोर ओसरणार, या तारखेपासून हवामान कोरडे; हवामान विभागाचा अंदाज

Rain
Rainesakal
Updated on

मुंबई- हवामान विभागाने ५ सप्टेंबरपासून राज्यात हवामान कोरडे होण्यास सुरवात होईल असं सांगितलं आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर ओसरत जाणार आहे. याआधी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणात पावसात अंदाज वर्तवला होता. (imd rain forecast maharashtra 2023 monsoon news)

हवामान विभागाने म्हटलं की, 'अरबी समुद्रावरील डिप्रेशन रविवारी दक्षिण कोकणमार्गे दक्षिण मध्य महाराष्ट्रावर येऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्राचीही तीव्रता कमी झाली. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आता मोठ्या पावसाची शक्यता नाही. राज्यावर असलेल्या बाष्पामुळे पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ५ ऑक्टोबरपासून कोकण वगळता राज्यातील इतर भागांत हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल.'

Rain
Rain Updates : घाट रस्त्याने प्रवास टाळा; पुढील १२ तासांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता

दक्षिण मध्य महाराष्ट्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामान कोरडे होणार होणार असं आयएमडीबीने सांगितले. याआधी १ ऑक्टोंबरच्या अंदाजात आयएमडीमध्ये अशी सूचना दिली होती की, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे - घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाची शक्यता. झाडे पडणे, डोंगरावरून दगड माती वाहून येणे, दरड कोसळणे शक्य. पाऊस कमी होईपर्यंत घाट रस्त्यांनी प्रवास टाळावा.

Rain
Mumbai Rain News : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मुंबईवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मुंबईतून मान्सून माघारी फिरण्यास १० ऑक्टोबरनंतरच मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.