Weather Update
Weather Updateesakal

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला! कशी असेल पावसाची पुढची स्थिती? वाचा हवामान विभागाचा अंदाज

अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे
Published on

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे. झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि नागलँड ही राज्ये वगळता उर्वरित राज्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे.

तर महाराष्ट्रात गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात पावसाचा अंदाज कमी असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात येत्या 3ते 4 दिवसांमध्ये हलका ते मध्यम पाऊस असणार आहे.

Weather Update
Weather Update: राज्याच्या अनेक भागात पावसाची विश्रांती; पुन्हा कधी मुसळधार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही. मुंबईमध्ये सोमवारपासून पुढील चार ते पाच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मध्य आणि दक्षिण भारतातही कमी पावसाची शक्यता आहे.

कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी असेल, असा अंदाज IMDने वर्तवला आहे.

Weather Update
Maharashtra Blog Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()