एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय

एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Service Public Commission - MPSC) म्हणजेच एमपीएससीने पोलिस उपनिरिक्षक (मुख्य) (PSI Mains) अर्थात 'पीएसआय' पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, इथून पुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुणं मिळवणं आवश्यक आहे, अशी माहिती आयोगाने परिपत्रक काढत दिली आहे. (Important decision taken by MPSC regarding PSI recruitment)

तसेच या पदासाठीच्या शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे. म्हणजेच उमेदवाराच्या क्वालिफिकेशनसाठी फक्त मैदानी गुण गृहीत धरले जाणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय
Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर का?

उमेदवाराने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्याला मैदानी परीक्षेत जर 60 गुण मिळाले तर त्याला मुलाखत देता येणार आहे. हे नवे नियम 2020 मध्ये निघालेल्या जाहीराला लागू असणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता ते शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीतून वगळले आहेत. आता इथून पुढे ते फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.