Chhagan Bhujbal: 'सगे सोयरे'चा प्रश्न सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय; छगन भुजबळांनी दिली माहिती

ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. यावेळी सगेसोयरेचा प्रश्न सोडवण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
Why did Chhagan Bhujbal withdraw from the election
Bhujbal esakal
Updated on

मुंबई : ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. यावेळी सगेसोयरेचा प्रश्न सोडवण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर याबाबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. (Important decision with CM meeting to solve issue of sage soyre says Chhagan Bhujbal after meeting)

छगन भुजबळ म्हणाले, सगेसोयरेच्या बाबतीत बैठकीत बराच मोठा उहापोह झाला. आम्ही त्यांना सांगितलं की, यामध्ये खूप तृटी आहेत. एससी, एसटी आणि ओबीसी यांना प्रमाणपत्र कसं द्यावं, जात पडताळणी कशी करावी याबाबत पूर्ण माहिती असलेलं एक पुस्तक आहे. त्यामुळं या सर्वांची पूर्तता करुन प्रमाणपत्रांचं वाटप केलं जातं. गेल्या वीस-पंचवीस वर्षात त्याला कोणीही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळं सगे सोयरेचं नवं डॉक्युमेट तयार करण्याची गरज नाही.

त्याचबरोबर आगामी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगेसोयरेंच्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय आम्ही घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मराठा समाजावर आम्ही अन्याय करणार नाही तसंच ओबीसी समाजावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अशी आमची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, काही मंत्री आणि आम्ही शिष्टमंडळ उद्या पुण्याला आणि वडिगोद्री इथं जाऊन ओबीसी उपोषणकर्त्यांना या सर्व गोष्टी समाजावून सांगणार आणि विनंती करणार त्यांनी उपोषण समाप्त करावं. दोन-चार दिवस आराम करावा आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठकतही त्यांना भाग घेता येईल अशी व्यवस्था करु, असं लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांना सांगणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.