शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं! पीकविम्यासाठी 1 रुपयापेक्षा जास्त पैसे मागितल्यास काय करणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

farmers crop insurance: . राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे.
Dhananjay munde
Dhananjay munde
Updated on

मुंबई- पीकविम्या संदर्भात अधिकची रक्कम घेतली जात असल्याचं समोर आलं आहे. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी येत आहेत, असं मुंडे म्हणाले.

सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या 9822664455 या क्रमांकावर व्हाट्सप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, असं मुंडे यांनी सांगितलं आहे.

Dhananjay munde
Phulambri : शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा तातडीने द्या!';संभाजी ब्रिगेडची तहसीलदारांकडे मागणी

सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Dhananjay munde
1 रुपयात उतरवा पीकविमा अन्‌ मिळवा 20,000 ते 81,000 भरपाई! विमा भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांना भरता येईल ‘या’ संकेतस्थळावरून अर्ज

विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

हे लुटारूंचे सरकार आहे. एक रुपये पीक विमा योजना आणली. फायदा पीक विमा कंपन्यांना झालाय. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी परिस्थिती आहे. निम्यापेक्षा जास्त पैसे पिक विमा कंपन्यांनी काढले. शेतकऱ्यांच्या पदरात काय मिळतं? असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, पीकविम्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()