Corona Update : कोरोना वाढतोय पण... ICMR च्या माजी अध्यक्षांच्या माहितीमुळे मिळेल मोठा दिलासा!

Corona Vaccine
Corona VaccineSakal
Updated on

देशभरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, यूपी, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये कोरोना प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी (७ एप्रिल) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे. 

याप्रकरणी आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉ रमण गंगाखेडकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे. "कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे, मात्र यांची गंभीर दखल घेण्याची गरज नाही. गेल्या १६ महिन्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हिरेएंट आला नाही. मृत्यू संख्येत देखील वाढ झाली नाही. साधारण सर्दी आणि खोकल्यासारखे आपण कोरोनाकडे पाहील पाहीजे," असे गंगाखेडकर म्हणाले. 

हाय रिस्क गृपमध्ये तुम्ही नसाल तर लशीचा तिसरा डोस देखील घेण्याची गरज नाही, असे गंगाखेडकर म्हणाले. ते एबीपी माझावर बोलत होते. 

Corona Vaccine
एकनाथ शिंदे, ४० MLA अन् भाजप तरी उद्धव ठाकरे देतील तगडी फाईट, राष्ट्रवादी-काँग्रेसचा प्लॅन काय?

गंगाखेडकर म्हणाले, नवीन कोणताही व्हेरिएंट आला नाही. कोरोना आता एन्डेमिक होत चालला आहे. मृत्यूची संख्या देखील वाढला नाही. दरवर्षी लस घ्यायची देखील गरज लागणार नाही. जगात १० लसींवर संशोधन सुरू आहे. तसेच दोन डोस झालेल्यांनू घाबरू नये. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्येचे आकडे नगण्य आहेत. विषाणूचा नवा प्रकार नाही. 

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या सक्रीय केसेसमध्ये गेल्या २४ तासांत ६,१५५ नव्या रुग्णांची भर पडली असून यामुळं देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३१,१९४ हजारांवर पोहोचली आहे. सध्या दररोजचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६३ टक्क्यांवर आहे.

Corona Vaccine
माहेरचे नाव जपण्यात अडचणी; चाकणकर म्हणतात, "आजवर हा मुद्दा आयोगापुढे आलाच नाही"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.