बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज जाहीर होणार बोर्डाचा निकाल; ‘या’ लिंकवर क्लिक करा अन्‌ निकाल पाहा; ‘SMS’वरही समजेल निकाल

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची संधी विविध लिंकच्या माध्यमातून पुणे बोर्डाने करून दिली आहे.
solapur
12th Resultsakal
Updated on

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी (ता. २१) निकाल जाहीर होणार आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांसह राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची संधी विविध लिंकच्या माध्यमातून पुणे बोर्डाने करून दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ५७ हजार १८८ विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पण, त्यातील ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. परीक्षेला बसलेल्यांचा निकाल मंगळवारी बोर्डाकडून जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठावर, ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२४’ अशी लिंक येईल. त्यावर क्लिक केल्यावर विद्यार्थ्याचा रोल नंबर, आईचे नाव टाका व सबमिट करण्यासाठी ‘पहा निकाल’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर निकाल येईल. निकालानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यान, यंदा पुणे बोर्डाने दरवर्षीपेक्षा काही दिवस लवकर बारावीचा निकाल जाहीर केला आहे. आता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २८ किंवा २९ मे रोजी जाहीर करण्याचे बोर्डाने नियोजन केले आहे.

‘या’ लिंकवर पाहाता येईल निकाल

  • mahahsscboard.maharashtra.gov.in

  • mahresult.nic.in

  • results.gov.in

  • results.nic.in

  • hscresult.mkcl.org

  • mahahsc.in

  • mahahsscboard.in

‘एसएमएस’वरही पाहाता येईल निकाल

विद्यार्थ्यांना मोबाइलवरील एसएमएसद्वारे देखील निकाल पहाता येणार आहे. त्यासाठी MHHSCSEAT नं. असे टाईप करून त्याठिकाणी विद्यार्थ्याने त्याचा बैठक क्रमांक टाकावा आणि 57766 या टोल फ्री क्रमांकावर मेसेज पाठवावा. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल त्याच क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.