टॅक्स भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नळ नसतानाही पाणीपट्टी; महापालिकेकडून ‘या’ मिळकतदारांच्या बिलात दुरुस्ती; खासगी नळ नसेल तरी भरावी लागेल सार्वजनिक पाणीपट्टी

अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही किंवा खुली जागा असताना त्याठिकाणी नळ कनेक्शन असल्याचे ग्राह्य मानून पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. अशा बिलांमध्ये दुरुस्ती केली जात असल्याचे महापालिकेतील कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.
solapur ujani dam news
solapur mahapalikasakal
Updated on

सोलापूर : शहरातील अनेक भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन पोचली नसून काही परिसरात आजही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही किंवा खुली जागा असतानाही त्याठिकाणी नळ कनेक्शन असल्याचे ग्राह्य मानून त्यांनाही पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. अशा बिलांमध्ये संबंधित मिळकतदाराच्या अर्जावरून दुरुस्ती केली जात असल्याचे महापालिकेतील कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.

सोलापूर शहरात एकूण दोन लाख ६० हजार मिळकती असून त्यापैकी खासगी नळ कनेक्शन असलेल्यांना वार्षिक दोन हजार ७५६ रुपयांची पाणीपट्टी आकारली जाते. तर खासगी नळ कनेक्शन नसेल किंवा त्या परिसरात पाइपलाइन जरी नसेल तरी त्या मिळकतदारांना घराच्या एकूण वार्षिक भाड्याच्या (कर पात्र मूल्याच्या) १२ टक्के पाणीपट्टी द्यावीच लागते. याशिवाय ज्या अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक कॉमन नळ कनेक्शन नसल्यास तेथील सर्वच फ्लॉटधारकांना वैयक्तिक पाणीपट्टी द्यावी लागते.

दरम्यान, वर्षातून एकदा महापालिकेकडून सर्व मिळकतदारांना बिलांचे वाटप होते. बिल मिळाल्यापासून १५ दिवसांत संबंधित मिळकतदाराने रोखीने बिल तथा कर भरल्यास त्यांना पाच टक्के तर ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत दिली जाते. सध्या थकबाकीदार मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली असून वेळेत टॅक्स न भरणाऱ्यांवर आता कारवाई करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘या’ मिळकतदारांच्या बिलात दुरुस्ती

  • खुली जागा असतानाही नळ कनेक्शन असल्याचे समजून पाणीपट्टी

  • अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही वैयक्तिक बिले आली आहेत

  • त्या भागात, नगरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आली नाही, तरी पाणीपट्टीचे बिल

  • घरगुती नळ असतानाही व्यावसायिक पाणीपट्टीची आकारणी

छापिल बिल न घेतल्यास १०० रुपये सवलत

दरवर्षी महापालिकेला शहरातील दोन लाख ६० हजार मिळकतींची बिले छपाई करून त्याचे घरोघरी वाटप करावे लागते. त्यातून वेळ, पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ग्रीन बिलाचीही सोय केली आहे. जे मिळकतदार छपाई बिल न घेता त्यांच्या ई-मेलवर बिल घेतात, त्यांना महापालिकेकडून १०० रुपयांची सवलत दिली जाते. सध्या शहरातील जवळपास चार हजार मिळकतदार ही सवलत घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.