Maratha Reservation : ओबीसी समाजावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही; असं का म्हणाले फडणवीस?

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
Devendra Fadnavis Maratha Community
Devendra Fadnavis Maratha Communityesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत अशी परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही.

नागपूर : ओबीसी समाजावर (OBC Community) कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार अन्याय होऊ देणार नाही, असे सांगून महाराष्ट्रात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत अशी परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी घोषणा केली आहे. मात्र, हे करताना कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही.

Devendra Fadnavis Maratha Community
कुठल्यातरी माकडानं चुकीची माहिती भुजबळांना दिलीये, पण लोकांचं खाल्ल्यानेच भुजबळ..; जरांगेंची सडकून टीका

ते म्हणाले, इकॉनॉमिक ॲडव्हायझर अकाउंटने ज्या काही शिफारसी केल्या होत्या. त्या संदर्भातील एक रोड मॅप प्रेझेंटेशन मंत्रिमंडळापुढे करण्यात आले आहे. या शिफारशी कशाप्रकारे लागू करायच्या, त्यांचा क्रम काय असला पाहिजे, गुंतवणूक कशी आणायची, अशा प्रकारचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने आता पुढची कारवाई होईल.

Devendra Fadnavis Maratha Community
Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात आढळल्या तब्बल 'इतक्या' कुणबी नोंदी; आतापर्यंत 19 लाख नोंदींची तपासणी

चांगली सुरुवात झाली आहे. त्यातून निश्चितपणे गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करत आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना देता येईल. मायनिंग फंडातून गोरगरिबांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी योजना नागपुरातून सुरू करीत आहोत. नागपूरमध्ये विशेषतः रुग्णालय आपल्या दारी हा उपक्रम सुरू करणार आहोत. ज्यामुळे गरिबांना दारावर आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.