MPSC ची परीक्षा 2025 पासून वर्णनात्मक स्वरुपाची; आयोगाकडून शिक्कामोर्तब

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात होईल यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
MPSC
MPSC esakal
Updated on

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात होईल यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात व्हावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. त्याबाबत आयोगाने तयारी देखील सुरु केली होती. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२५ पासून परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात होईल हे स्पष्ट केलं आहे.

एमपीएससीची परीक्षा २०२५ पासून वर्णनात्मक स्वरुपाची होईल हे आयोगाने यापूर्वीच जाहीर केलं होतं. पण, तरी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती होती. अखेर आयोगाकडून याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. खरंतर २०२२ पासूनच अशा परीक्षेचे सुतोवाच आयोगाकडून करण्यात आले होते. नवा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू होणार होता. पण, एका वर्षात अशा बदलास सामोरे जाण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला होता.

MPSC
MPSC : ‘एमपीएससी’त अंतर्गत राजकारण; उमेदवारांचा आरोप

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहून याबाबत विचार करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आयोगाने एमपीएससी परीक्षेचे वर्णनात्मक स्वरुप २०२५ पासून लागू होईल अशी घोषणा केली होती. पण, तरी याबाबत संभ्रम कायम होता. किंबहुना काहींकडून याबाबत समाजमाध्यमावर चुकीची माहिती दिली जात होती. त्यामुळे काहींनी याबाबत आयोगाला स्पष्टता देण्याची मागणी केली होती.

MPSC
Sakal Podcast : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडवीसांकडून प्रयत्न? ते धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा!

विद्यार्थ्यांच्या संभ्रमाची दखल आयोगाने घेतली. २०२५ पासून एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाचीच असेल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनामधील संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. शिवाय आता विद्यार्थ्यांना वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखात आणि लेखी परीक्षा असं मिळून एकूण २ हजार २५ गुणांची ही सुधारित परीक्षा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.