उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर त्यांच्याविषयी आदर वाढला, जलील यांनी केले कौतुक

'तुमचा नम्रपणा तुमच्या पक्षातील सर्व विरोधकांना चपराक'
CM Uddhav Thackeray And Imtiaz Jaleel
CM Uddhav Thackeray And Imtiaz Jaleelesakal
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांचे नेतृत्व एकनाथ शिंदे हे करित आहेत. एकूण ४० पेक्षा अधिक आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे सरकार पडणार की जाणार ? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज बुधवारी (ता.२२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. या संवादाचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी ट्विट करुन कौतुक केले आहे. (Imtiaz Jaleel Appreciate The Truthfulness Of Chief Minister Uddhav Thackeray)

CM Uddhav Thackeray And Imtiaz Jaleel
पैसे देतील त्यांच्याकडे ते पळतील, जलीलांची औरंगाबादच्या शिवसेना आमदारांवर टीका

जलील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सच्चेपणाचे कौतुक. आमच्यामध्ये राजकीय अथवा विचारसरणीबाबत शिवसेनेशी मतभेद असेल तरी आज उद्धव ठाकरे यांना ऐकल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर वाढला आहे. तुमचा नम्रपणा तुमच्या पक्षातील सर्व विरोधकांना चपराक असल्याचे इम्तियाज जलील यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या आमदारांना लगावला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर जलील म्हणाले, महाराष्ट्राने कधीच अशी स्थिती पाहिलेली नाही. (Maharashtra Politics)

.

CM Uddhav Thackeray And Imtiaz Jaleel
देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, मोदींच्या धोरणांवर राहुल गांधींची टीका

तसेच इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतील शिवसेनेच्या पाच बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. जिकडे पैसे मिळतील तिकडे हे लोक पळतात, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.