नुपूर शर्माला फाशी द्या; इम्तियाज जलील यांची केंद्राकडे मागणी

'कोणत्याही धर्मविरोधात कोणी बोलत असेल तर त्यावर कडक कारवाई केली पाहिजे.'
Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel Newsesakal
Updated on

औरंगाबाद : नुपूर शर्मा, जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने जगभरातील मुसलमानांमध्ये संताप आहे. दहा दिवसानंतर दिखाव्यासाठी कारवाई केली गेली, असा आरोप खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भारतीय जनता पक्षावर केला. औरंगाबाद (Aurangabad) येथे आज शुक्रवारी (ता.दहा) नुपूर शर्मा व जिंदाल यांच्याविरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावर जलील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Imtiaz Jaleel Says, BJP Action On Nupur Sharma And Navin Jindal Only Show)

Imtiaz Jaleel News
जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला मतदान, म्हणाले - आय लव्ह इट

इतरांना छोट्या गोष्टींसाठी तुरुंगात टाकले जाते. मग शर्मा व जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सर्व मुसलमानांच्या भावना दुखवले गेले आहेत. आम्ही काही दिवस प्रतिक्षा केली. जे लोक धर्म, जातवरुन शांतता भंग करतात अशा लोकांवर पोलिस, प्रशासन काहीच कारवाई करित नाही.

Imtiaz Jaleel News
'हिंदू देवतांचा अपमान केला जातो तेव्हा...'; नुपूर शर्मा वादात कंगनाची उडी

कदाचित कोणाला वाटल नाही, की सर्व वयोगटातील लोक रस्त्यावर आली. आंदोलन करण्याचा आपला हक्क आहे. सर्व लोकांना विनंती आहे, की जिथे आंदोलन होत आहे, तिथे शांतता राखावी. नुपूर शर्मा यांना फाशी दिली पाहिजे. कोणत्याही धर्मविरोधात कोणी बोलत असेल तर त्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारकडे केली. हात जोडून सर्व मुसलमानांना विनंती करतो, की शांतता राखा. आज आपण सरकारवर दबाव बनवला आहे, असे जलील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.