औरंगाबाद : एमआयएम राज्यात महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे पक्षाचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटले आहे. यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेबरोबर एमआयएमची (MIM) आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. यावर जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, भाजपला (BJP) दूर ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु असून कोणाच्या ही सांगण्यावरुन आम्ही मैत्रीचा हात पुढे केलेला नाही. देश वाचवा यासाठी आम्हाला असे करावे लागत आहे. (Imtiaz Jaleel Says, For Alliance I Will Meet Sharad Pawar And Uddhav Thackeray)
महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप हा देशासाठी घातक आहे. तो पक्षा राजकीय फायद्यांसाठी समाजात द्वेष पसरवत आहे. यामुळे आघाडीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आपण लवकरच शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचे जलील यांनी औरंगाबादेत आज रविवारी (ता.२०) प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
अनेक नेत्यांनी एमआयएमच्या आघाडीच्या प्रस्तावावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एमआयएम हा भाजपची बी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केले आहे. शिवसेनेची बदनामी व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे एमआयएमच्या युती प्रस्तावावर खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. राज्यात कोणीही एमआयएमसोबत जाणार नसून युती फक्त भाजपबरोबर असल्याचे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले असल्याचे राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.