२९ महिन्यांत २६७१ लाचखोर ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! महसूल, पोलिस, शिक्षण विभाग अव्वल

‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र’च्या वल्गना होत असतानाच दुसरीकडे जुलै २०२२ ते ६ जून २०२३ या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल एक हजार ३८ जणांविरुद्ध तर जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ या काळात एक हजार ६३३ जणांविरूद्ध लाचखोरीची कारवाई केली आहे.
3acb_20tryap_201
3acb_20tryap_201sakal
Updated on

सोलापूर : ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र’च्या वल्गना होत असतानाच दुसरीकडे जुलै २०२२ ते ६ जून २०२३ या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल एक हजार ३८ जणांविरुद्ध तर जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ या काळात एक हजार ६३३ जणांविरूद्ध लाचखोरीची कारवाई केली आहे. त्यात नेहमीप्रमाणे महसूल व पोलिस विभागच पुढे असून ‘क्लास वन व टू’चे १८९ अधिकारी त्यात आहेत. बहुतेक शासकीय विभागांमध्ये ‘टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामच होत नाही’ अशी स्थिती असल्याचे या कारवायातून स्पष्ट होते.

भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या हे महाराष्ट्रातील प्रमुख समस्या आहेत. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ची घोषणा केली. त्यानुसार अनेक राज्यांनी त्यादृष्टिने खबरदारी घेतली. पण, दबलेल्यांचा आवाज होणाऱ्या विभागांमधील लाचखोर अधिकारी-कर्मचारीच त्यांच्याकडे लाचेची मागणी करून मुस्कटदाबी करीत आहेत.

महसूल, शिक्षण, पोलिस व महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत असे प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मागील ११ महिन्यातील कारवाईतून स्पष्ट होते. तत्पूर्वी, जानेवारी २०२१ ते जून २०२२ या काळात देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार १५९ ठिकाणी सापळे रचून एक हजार ६३३ जणांना रंगेहाथ पकडले होते. जुलै २०२२ ते ५ जून २०२३ या काळात देखील राज्यातील ७२५ सापळ्यात एक हजार ३८ जण सापडले आहेत.

२८७ वरिष्ठ अधिकारी कारवाईच्या जाळ्यात

राज्यातील लाचखोरीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. कार्यालयात आठ तासांची ड्यूटी, पंखे, वातानुकूलित केबिन, गडगंज पगार, ये-जा करायला शासनाची चारचाकी अशी स्थिती असतानाही देखील जवळपास दीडशे अधिकारी मागील ११ महिन्यांत लाचखोरीत अडकले आहेत. त्यात ‘क्लास-वन’चे ९८ अधिकारी तर १८९ ‘क्लास-टु’चे अधिकारी आहेत. काहीजण कुटुंबाचा कोणताही विचार न करता दोनशे ते पाचशे रुपयांची लाच घेताना सुद्धा सापडले आहेत.

लाचखोरीची आकडेवारी

  • जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२२

  • सापळे

  • ११५९

  • लाच घेताना सापडलेले

  • १६३३

  • ३० जून २०२२ ते ६ जून २०२३

  • सापळे

  • ७२५

  • लाचखोर संशयित

  • १०३८

तक्रारीसाठी १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा कॉल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते. विभागाकडून संबंधितावर लगेचच कारवाई होत असल्याने तक्रारदार आता पुढे येत आहेत. तक्रारदाराला कारवाईच्या माध्यमातून न्याय मिळत आहे. तक्रारदारांनी १०६४ टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. त्यानुसार संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यावर गोपनियरित्या कारवाई शक्य होते.

- गणेश कुंभार, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.