गँगवार संपलं! बीडमध्ये कुत्र्यांच्या जीवावर उठलेली माकडे जेरबंद

Monkey Caught by Forest Department in Beed: काही दिवसांपासून बीडमध्ये उच्छाद मांडणाऱ्या माकडांना वनविभागाच्या पथकानं जेरबंद केलं आहे.
Monkey caught by Forest Department
Monkey caught by Forest DepartmentSakal
Updated on

उच्छाद घातलेली माकडं बीडमध्ये जेरबंद (Monkey Caught by Forest Department in Beed)-

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये (Beed) उच्छाद मांडणाऱ्या माकडांना (Monkey) नागपूर (Nagpur) वनविभागाच्या पथकाने (Forest Department) जेरबंद केले असून त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेलं माकड आणि कुत्र्यांतील (Dog) गँगवार थांबणार आहे. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील माजलगाव (Majalgav) इथल्या लवूळ (Lavul) गावात कुत्र्यांच्या टोळीने माकडाच्या पिल्लावर हल्ला करुन त्याच्या बळी घेतला होता. या घटनेनं संतप्त झालेल्या माकडांच्या टोळीनं तब्बल १०० पेक्षा जास्त कुत्र्यांना मारल्याचं बोललं जात आहे. कुत्री आणि माकडांमधील या सूडयुद्धाने क्रुरतेचा कळस गाठला होता.

Monkey caught by Forest Department
माकडं आणि कुत्र्यांच्यात गँगवार; माकडे उठली कुत्र्यांच्या जीवावर

गेल्या महिनाभरापासून ही माकडं (Monkey) कुत्र्यांवर (Dog) सूड (Revenge)उगवत होती. याच सूडापोटी ही माकडं कुत्र्यांच्या पिल्लांना पळवून त्यांना इमारती किंवा झाडं अशा उंच ठिकाणांहून फेकून देत होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी धारूर (Dharur Forest Department) येथील वनविभागाशी संपर्क साधला.

त्यानंतर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूर वनविभागाच्या पथकाने महत्प्रयासाने जेरबंद (Monkey Arrested) केल्याची माहिती बीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest Officer) सचिन कंद यांनी माध्यमांना दिली. जेरबंद केलेल्या माकडांना जंगलात सोडण्यात येणार असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

Monkey caught by Forest Department
कसं काय झालं...मेलेलं कुत्र झाडाच्या शेंड्यावर चढलं

दरम्यान, एरवी कुत्र्यांना पाहताच धूम ठोकणारी माकडं कुत्र्यांच्या जीवावर उठल्याच्या प्रकाराने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माकडं आणि कुत्र्यांमधील या संघर्षाने (conflict) क्रुरतेचा (Cruel) कळस गाठल्याचं दिसत होते. त्यांच्यातील संघर्ष या टोकाला जाईल याचा कुणीही विचार केला नसेल. दरम्यान या उच्छाद मांडणाऱ्या या माकडांना जेरबंद केल्यानं बीडमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.