अडीच वर्षांत 22 लाख लिटर रसायन, दीड लाख लिटर हातभट्टी नष्ट! नूतन पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांपुढे हातभट्टीमुक्त सोलापूर करण्याचे आव्हान

अडीच वर्षांत तब्बल २२ लाख लिटर रसायन, दीड लाख लिटर हातभट्टी, ४०००० लिटर ताडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. हे प्रमाण कमी करून गावागावातील तरुणांना व्यसनापासून रोखण्याचे आव्हान नूतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्यापुढे आहे.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टीमुक्त गाव असे अभियान सुरू आहे. तरीही, जिल्ह्यात जवळपास १२० ठिकाणी हातभट्टी दारू तयार होते, अशी माहिती राज्य उत्पादनचे तत्कालीन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी संकलित केली होती. त्यांनी अडीच वर्षांत तब्बल २२ लाख लिटर रसायन, दीड लाख लिटर हातभट्टी व ४० हजार लिटर ताडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. हे प्रमाण कमी करून गावागावातील तरुणांना व्यसनापासून रोखण्याचे आव्हान नूतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्यापुढे आहे.

सर्वाधिक सण-उत्सव साजरे करणारे शहर म्हणून सोलापूरची राज्यभर ओळख आहे. दुसरी ओळख म्हणजे ताडी व हातभट्टीचा जिल्हा अशी देखील आहे. १५ ते २० वर्षांपासून असलेली ही ओळख अद्याप पूर्णपणे कोणालाही पुसता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील मुळेगाव तांडा, तळे हिप्परगा, कोंडी, दोड्डी अशा विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी तयार होते. हातभट्टी कोणत्या भागात आहेत आणि तयार झालेली हातभट्टी कोणकोणत्या गावांमध्ये विक्री होते, याची माहिती पोलिसांनी यापूर्वीच संकलित केली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांनी दारूबंदीचे ठराव केले, स्थानिक पोलिसांना निवेदनेही दिली, तरीदेखील अशा अनेक गावांमध्ये सध्या हातभट्टीची विक्री होतेय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हातभट्टीच्या ठिकाणांवर कारवाई करताना ज्या गावांमध्ये अवैधरीत्या दारू विक्री होते, त्याठिकाणीही सतत भेटी आवश्यक आहेत. अडीच वर्षात अवैधरीत्या तयार होणारी १४ कोटींची दारू नष्ट केली जाते म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर हातभट्टी व ताडी तयार होत असेल, किती तरुण या घातक दारूच्या आहारी गेले असतील, या अंदाजाने अनेकांची झोप उडाली आहे.

अडीच वर्षातील ‘एक्साईज’ची कारवाई

  • २०२२-२३

  • हातभट्टी जप्त

  • ६७,४२३ लिटर

  • रसायन नष्ट

  • ६,६२,४४० लिटर

  • ताडी जप्त

  • २१,६६३ लिटर

--------------------------------------------------------------------------

  • २०२३-२४

  • हातभट्टी जप्त

  • ६६,८२२ लिटर

  • रसायन नष्ट

  • १२,०७,७४९ लिटर

  • ताडी नष्ट

  • १२,४५६ लिटर

  • -------------------------------------------------------------------

  • २०२४-२५

  • हातभट्टी जप्त

  • २०,३८४ लिटर

  • रसायन नष्ट

  • ३,६६,२२० लिटर

  • ताडी नष्ट

  • ४,३४९ लिटर

२२४ जणांकडून घेतले बंधपत्र

हातभट्टी व ताडीच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या २२४ तरुणांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ९८ लाख ५५ हजार रुपयांचे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले आहे. दरम्यान, या कारवाईत सातत्य व त्या व्यवसायातील तरुणांना पर्यायी रोजगाराची सोय करून देण्यासाठी मदत केल्यास निश्चितपणे हा अवैध व्यवसाय कमी होवू शकतो, याची जाणीव ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या सुरवातीला सर्वांनाच आली होती. आता या अवैध व्यवसायाशी निगडित लोकांवर कडक कारवाई करू, वेळप्रसंगी मोक्का, एमपीडीएच्या कारवाई करू, आठवड्यातून दोनदा धाडी टाकल्या जातील, असे राज्य उत्पादन शुल्कच्या विद्यमान अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण पोलिसांचीही मदत घेतली जाईल, असेही त्या म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.