Samruddhi Expressway : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण

Samruddhi Expressway
Samruddhi Expresswayesakal
Updated on

शिर्डीः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीमध्ये समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात झालं. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री उद्घाटनासाठी दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरमधील कार्यक्रम आटोपून शिर्डीकडे प्रस्थान केलं.

आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे. या उद्घाटनानंतर शिंदे-फडणवीस सभास्थळी दाखल झाले आहेत.

शिर्डी ते इगतपुरी हा ८० किलोमीटरचा हा टप्पा आहे. याचा फायदा मुंबई आणि आसपासच्या शहरातून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना या महामार्गाचा लाभ होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. नागपूरहून इगतपुरीपर्यंत आता नॉनस्टॉप प्रवास करता येणार आहे.

Samruddhi Expressway
Mumbai Airport: 300हून अधिक प्रवाशी 12 तासांपासून अडकले! मुंबई एअरपोर्टवर प्रचंड गर्दी

गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे.

Samruddhi Expressway
Eknath Shinde : 'शासन आपल्या दारी' ही योजना नेमकी आहे तरी काय? मुख्यमंत्री शिंदेंनी केलं स्पष्ट

दरम्यान, प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहनांसाठी खुला झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), राज्य वाहतूक पोलीस आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या नेतृत्वाखालील समितीने एमएसआरडीसीला काही जागा रंगवण्याची सूचना केली आहे. तसेच वाहन चालकांना सतर्क ठेवण्यासाठी पोलिस सायरनचा आवाज निर्माण करणारी उपकरणे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.