एसटीचं उत्पन्न वाढल्यास कर्मचाऱ्यांना इन्सेन्टिव्ह; सरकारची घोषणा

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढीला मंजुरी
ST Bus Employee
ST Bus Employeesakal media
Updated on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य शासनानं मान्य केल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जर एसटीचा फायदा झाला तर या नफ्यातील वाटा कर्मचाऱ्यांनाही देण्यात येणार आहे. यासाठी इन्सेन्टिव्ह जाहीर करण्यात आला आहे.

ST Bus Employee
एसटीचं विलीनीकरण तुर्तास नाहीच; मूळ वेतनवाढीला मंजुरी

परब म्हणाले, "आज ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून एक इन्सेन्टिव्हची योजना आम्ही आज जाहीर करत आहोत. विविध राज्यांमध्ये ज्या योजना आहेत, त्यानुसार आम्हीही निर्णय घेऊ की, एसटीचं उत्पन्न वाढलं तर हे उत्पन्न वाढवण्यासाठी ड्रायव्हर-कंडक्टर आहेत ज्यांनी जास्त पैसे आणले त्यांना चांगला इन्सेन्टिव्ह देण्यात येईल, म्हणजेच पगाराबरोबरच एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी देखील कामगारांना प्रोत्साहन मिळेल"

ST Bus Employee
संप संपल्याची घोषणा आम्ही करणार नाही: पडळकर, खोत

आजच्या बैठकीत आणखी एक मागणी आली की, ज्या कामगारांनी आत्महत्या केलेली आहे. या कामगारांच्या आत्महत्येचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. कोणीही आत्महत्या करु नये असं आमचं म्हणणं आहे. त्यांच्याबाबतीत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल. कर्चमाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या. त्यानुसार वेतनवाढ आणि पगाराची हमीची मागणी आम्ही मान्य केली आहे, असंही यावेळी परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं.

ST Bus Employee
Farm Laws: सोशल मीडियावर शीख टार्गेट; फेक अकाऊंट्सचा पर्दाफाश!

त्याचबरोबर काही अटींपैकी एक आमच्या निदर्शनास आली आहे की, जे कामगार कामावर येतात परंतू ड्युटी नसल्यामुळं त्यांची रजा भरून घेतली जाते. म्हणजे कामावर येऊनही त्यांना पगार मिळत नाही. त्यामुळे आम्ही आजच्या आज हे मान्य केलंय की, यापुढे जो कामगार कामावर हजेरी लावेल त्याला त्याचा पगार मिळेल, असंही यावेळी परब यांनी जाहिर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.