बारामतीच्या बागायतदाराला प्रश्न पडला, पुलं काम काय करतात?

शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे यांच्यातील एक विनोदी पण प्रेरणादायी गाजलेला किस्सा..
शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे
शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडेsakal
Updated on

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे मराठी भाषेतील एक सुप्रसिद्ध साहित्यिक ,नाटककार, विनोदकार, अभिनेता, कथाकार आणि पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आणि गायक असं महाराष्ट्रातील लाडका व्यक्तिमत्व असणारा भन्नाट माणुस.

त्यांचे अनेक किस्से आजही अजरामर आहे. एक उत्तम व्यक्तीमत्त्व असलेले पु.ल देशपांडे यांनी आयुष्याला एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले आहे. शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे यांच्यातील एक विनोदी पण प्रेरणादायी गाजलेला किस्सा… (Incident told by Sharad Pawar about G D madkulkar and P L Deshpande in baramati)

शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे
शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसचा पाठिंबा - नाना पटोले

2003 साली शरद पवारांनी बारामतीत माडगूळकरांच्या नावाने एक मोठे सभागृह बांधले त्यावेळी माडगूळकर कुटुंबाला देखील बोलविण्यात आले होते. त्यावेळी शरद पवारांना हा किस्सा सांगितला..

बारामतीतील साहित्य मंडळाकडुन एक कार्यक्रम घेण्याचे ठरवले गेले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ग.दि. माडगूळकर आणि पु.ल देशपांडे यांना आणायचे ठरले.

दोघांनीही आमंत्रण स्वीकारले. दोन मोठे साहित्यकार येणार म्हटलावर बारामतीकर खुश झाले. या वेळी या दोघांना आणायची जबाबदारी शरद पवार यांच्यावर टाकण्यात आली. दोन मोठ्या लोकांना आणायचं म्हणजे चारचाकी गाडी लागणार होती पण शरद पवारांकडे तेव्हा गाडी नव्हती. मग शरद पवारांनी एक युक्ती लढवली एका मोठ्या बागायतदाराला पकडुन त्यांची गाडी मागुन घेतली आणि दोन्ही मोठ्या माणसांना कार्यक्रम ठिकाणी सुखरूप आणले. कार्यक्रम भारी झाला.

शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे
'आमच्या हातात २ दिवस ईडी द्या, फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील'

दोघांनी परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले तेव्हा ज्यांची गाडी होती तो मालक काही कारणाने त्यांच्यासोबत पाहुण्यांना सोडवायला निघाला. तेव्हा शरद पवारांनी दोन्ही लेखकांसोबत त्या बागायतदाराची ओळख करुन दिली. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या तेव्हा बागायदाराने अचानक प्रश्न विचारला, "तुम्ही दोघे नेमकं काय करता ? म्हणजे धंदापाणी हो..."

तेव्हा शरद पवारांना चिंता वाटु लागली की आता काय बोलाव पण पु.ल. शांतपणे बोलले की हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्ठया लिहून देतात आणि मी त्यांच्या बाजुला बसुन छत्रीच्या तुटलेल्या काड्यांची दुरूस्ती करतो. हा जरी विनोदाचा भाग झाला तरी या दोन्ही साहित्यिकांनी पुढच्या पिढीला एक मोठा संदेश यातुन दिला आहे.ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे या दोन मित्रांची जोडी भारी होती.

शरद पवार, ग.दि .माडगूळकर आणि पु.ल देशपांडे
राज्यसभेच्या पराभवाचं खापर शिवसेनेच्या माथी, जयंत पाटील म्हणाले..

पु.ल. यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पु. ल.नी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम असा आहे.अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तीचे १२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.