Raid on Pradeep Sharma: मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर गुरूवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी कारवाई केली. करचुकवेगिरी केल्या प्रकरणी अंधेरी भागातील प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानाची आयकर विभागाने झडती घेतली. प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती
प्रकरण थोडक्यात-
एका माजी आमदार आणि खासदार रमेश दुबे यांच्याशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. माजी आमदारावर मोठ्या प्रमाणात करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. शर्मा हे काही राजकारणी आणि उद्योजकांसोबत जोडलेले आहेत, त्यांचीही करचुकवेगिरीप्रकरणी चौकशी सुरू आहे.सगळी मालमत्तेची पडताळणी केली गेली त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का याचा तपास आयकर विभाग करत आहे. (Latest Marathi News)
आमदार कनेक्शन-
शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी माजी खासदार रमेश दुबे आणि त्यांच्या बांधकाम व्यावसायिक मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pradeep Sharma News in Marathi)
शर्मावर कारवाई-
25 फेब्रुवारी 2021 रोजी जिलेटिनने भरलेली एक चारचाकी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ सापडली होती. त्यानंतर 5 मार्च रोजी या चारचाकीचा मालक मनसुख हिरेनचां ठाण्याच्या खाडीत मृतदेह मिळाला. या प्रकरणी एनआयएने तपास केला. तपासादरम्यान जून 2021 मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेचाही हात असल्याचं समोर आलं होतं. (Who is Pradeep Sharma)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.