Maharashtra Breaking : राज्यात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे आकडेवारीत निष्पन्न

Women-Atrocity
Women-Atrocity
Updated on

Maharashtra Breaking : राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

त्यातील गंभीर बाब म्हणजे महिला विनयभंग आणि अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून मुंबईनंतर पुणे आणि नागपूर शहरात अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत.

मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यावर्षी पहिल्या ८ महिन्यांत मुंबईत महिलांचे विनयभंग/अश्लील वर्तनाच्या १२५४ घटना नोंदवल्या गेली आहेत. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे.

याच कालावधीत ५४९ बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. ३०० मुली/अल्पवयीन तरुणींना फूस लावून किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे.

Women-Atrocity
Mumbai Breaking: रेल्वेस्थानकांवर घाण करणाऱ्यांवर होणार कारवाई ; क्लीनअप मार्शलची होणार नियुक्ती

पुणे, नागपूर यादीत

मुंबईनंतर राज्यात पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत पुण्यात विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात १२४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपुरातही गेल्या ८ महिन्यांत ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत; तर १६५ महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या आहेत.

Women-Atrocity
Maharshtra Budget : आपलं अर्थसंकल्पीय बजेट नक्की कोण मंजुर करतं?

विद्यार्थिनींना लक्ष्य

विनयभंग किंवा महिलांशी अश्लील वर्तनाच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. समाजातील टवाळ युवकांचा विनयभंगाच्या आरोपींमध्ये मोठ्या संख्येने समावेश आहे.

तसेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांवर दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होण्याची भीतीने बऱ्याच वेळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात. अनेकदा विनयभंग/अश्लील वर्तनाचे गुन्हे दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचे काही घटनांतून समोर आले आहे.

Women-Atrocity
Mahrashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा उद्या फैसला; झिरवाळ म्हणतात, सरकार स्थिर व्हायला पाहिजे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.