नाशिक : पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी उपविभागीय अधिकाऱ्यांना (प्रांत) देण्यात आल्याने टँकरची संख्या वाढण्याची शक्यता तयार झाली होती. एका आठवड्यात तसे घडले. राज्यातील ११८ गावे आणि ३५८ वाड्यांसाठी सध्या ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टँकरची संख्या ५५ ने वाढली आहे.
टंचाईच्या झळा वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक आणि पुण्याचा समावेश आहे. मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात एकही टँकर सुरु नव्हता. २३ एप्रिल २०२१ ला पुणे जिल्ह्यातील ४ गावे आणि ९ वाड्यांसाठी ४ टँकर धावत होते.
आता मात्र पुणे जिल्ह्यातील १८ गावे आणि १३५ वाड्यांसाठी २४ टँकर सुरु करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील झळा गेल्यावर्षी इतपत पोचल्या आहेत. गेल्यावर्षी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील २९ गावे आणि ११ वाड्यांसाठी १८ टँकर सुरु होते. मागील आठवड्यात ८ गावांसाठी ७ टँकर सुरु होते. आता २३ गावे आणि ४ वाड्यांसाठी १६ टँकर सुरु करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये कोकण विभागातील ६५ गावे आणि २१० वाड्यांसाठी ६५, नाशिक विभागातील ३२ गावे आणि २१ वाड्यांसाठी २३, हिंगोलीतील एक व नांदेडमधील दोन अशा तीन गावांसाठी ३, अमरावती विभागातील ३३ गावांसाठी ३३ अशा एकूण राज्यातील १४२ गावे आणि २४३ वाड्यांसाठी १३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.
पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरचा आधार
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारीपेक्षा खासगी टँकरचा आधार यंत्रणेला असतो. त्यास यंदाचे वर्ष सुद्धा अपवाद राहिलेले नाही. राज्यात धावत असलेल्या ११३ टँकरपैकी ८८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उरलेले २५ टँकर सरकारी आहेत. कोकणात ५५ खासगी २ सरकारी, नाशिक विभागात ७ खासगी व १४ सरकारी, पुणे विभागात १५ खासगी आणि ९ सरकारी, नांदेडमध्ये १, तर अमरावती विभागात १० खासगी टँकर सुरु आहेत.
जिल्हानिहाय टँकरची स्थिती
(कंसातील आकडे १८ एप्रिल २०२२ चे आहेत)
जिल्हा गावे-वाड्यांची संख्या टँकरची संख्या
ठाणे ७२ (०) १८ (०)
रायगड ९९ (१९२) १२ (१२)
रत्नागिरी ४५ (३४) ४ (४)
पालघर ५६ (५५) २३ (२२)
जळगाव २ (२) २ (२)
नगर ११ (११) ३ (३)
नांदेड १ (१) १ (१)
अमरावती ४ (४) ४ (४)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.