वाढती रूग्णसंख्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते - आदित्य ठाकरे

सध्या तरी लगेच शाळा कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेsakal
Updated on

मुंबई : देशासह राज्यातील वाढती कोरोना (Corona Cases In Maharashtra) रूग्णांची संख्या ही कोरोनाच्या तिसऱ्या (Corona Third Wave) लाटेची सुरुवात असू शकते, अशी भीती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. शाळा,कॉलेजेसमध्ये 3 जानेवारीपासून लसीकरणासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसे फ्रंट लाईन वर्कर्स आणि ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या बूस्टर डोसचेदेखील नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (AAdity Thackeray On Covid 19 Third Wave)

आदित्य ठाकरे
खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनच्या (Omicron Cases Raised In Maharashtra) रूग्णांमध्ये वाढत होत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मात्र, रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्याचे सांगत ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब आहे. परंतु, नागरिकांनी यामुळे गाफिल राहू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.

तर इमारती सील होणार

दहाहून जास्त रूग्ण कोणत्याही इमारतीमध्ये पॉझिटिव्ह (Building Seal) आढळून आल्यास अशा इमारती सील करण्यात येतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शाळा, कॉलेज बंद (School Collage ) करण्याविषयी बोलताना ते म्हणाले की, सध्या तरी लगेच शाळा कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जाणार नाही त्या आस्थापना सील होतील. त्याशिवाय टेरेस पार्ट्या किंवा हाऊस पार्ट्या याबाबत स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असून सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर निर्बंध लावण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()