Sharad Pawar: याला म्हणतात नियती! ज्यांना पवारांनी घरी बसवलं, त्यांनाच आता विधानसभेत पाठवणार...

Harshavardhan Patil: सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांसोबत झालेल्या डीलमुळे ते शांत असायचे पण २०१४ त्यांनी वेगळाच निर्णय घेतला. त्यांच्या पक्षातले zp सदस्य दत्तात्रय भरणे यांना अपक्ष उभं केल. वरवर आघाडी धर्म भरणेंनी मोडला दाखवलं तरी त्यांना बळ कोणी पुरवलं हे वेगळं सांगायची गरज नाही. मुख्य म्हणजे मोठ्या पवारांनीही दादांच्या या निर्णयाला विरोध केला नाही.
MP Sharad Pawar
MP Sharad Pawaresakal
Updated on

राजकारणात कोणी कोणाचं मित्र किंवा शत्रू नसतं. वेळेनुसार गणितं आणि भूमिका बदलून ज्याला उभं राहता येतं तोच या मैदानात टिकतो. विषय आहे  इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचा. सोमवारी पाटील पवारांच्या पक्षात आले पण या घटनेला अनेक पैलू आहेत.

हर्षवर्धन पाटील २०१४ पर्यंत इंदापूरमध्ये चांगले रुळले होते. काँग्रेसमध्ये असताना विलासराव देशमुख गटातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची आणि चांगली खाती मिळवून त्यांनी ते वेळोवेळी सिद्धही केलं होतं. मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीला त्यांच्या बालेकिल्ल्याच्या बाजूला असणारा हा पाटलांचा गड कायमच खुपत होता. शेवटी शेजारचं झाड वाढलं तर आपली उंची आपोआप कमी दिसते याची कल्पना राष्ट्रवादी आणि विशेषतः अजितदादांना होतीच.

सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांसोबत झालेल्या डीलमुळे ते शांत असायचे पण २०१४ त्यांनी वेगळाच निर्णय घेतला. त्यांच्या पक्षातले zp सदस्य दत्तात्रय भरणे यांना अपक्ष उभं केल. वरवर आघाडी धर्म भरणेंनी मोडला दाखवलं तरी त्यांना बळ कोणी पुरवलं हे वेगळं सांगायची गरज नाही. मुख्य म्हणजे मोठ्या पवारांनीही दादांच्या या निर्णयाला विरोध केला नाही. 

२०१४च्या पराभवानंतर पाटलांचं इंदापूरकडे जरा दुर्लक्ष झालं, मुळात झालेला पराभव पचवायलाच त्यांना वेळ लागला. इकडे भरणेंनी चांगला जम बसवला. फारसे आक्रमक नसलेले भरणे सामान्यांमध्ये सहज मिसळतात हाच त्यांचा प्लस पॉईंट. इकडे पाटील मतदारसंघात फारसे फिरले नाही आणि २०१९ला पुन्हा भरणेंनी इंदापूर राखलं. तब्बल १० वर्षांचा राजकीय वनवास भोगून पाटील पुन्हा २०२४च्या लढाईसाठी सज्ज झालेत पण यावेळी भरणे मामांना कमी समजण्याची  चूक ते करूच शकत नाही. 

मागच्या ३ वर्षांपासूनचा सतत संपर्क, मुलगा राजवर्धन आणि मुलगी अंकिताची साथ आणि आता ऐन मोक्यावर भाजपला रामराम करत पवारांकडचा प्रवेश बरंच काही सांगणारा आहे. सध्या पाटलांकडे नीरा भीमा आणि कर्मयोगी कारखान्यांच्या शेतकऱ्यांची मोठी वोट बँक आहे. इंदापूर अर्बन बँक, तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि कार्यकारी सोसायट्याही आहेत पण हे सगळं असूनही त्यांना दोन टर्म पराभव स्वीकारावा लागला होता. 

MP Sharad Pawar
Raj Thackeray : विधानसभा जिंकण्यासाठी तयार रहा! राज ठाकरेंनी घेतला पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा

तिकडे भरणेंना वेगळ्याच अडचणी आहेत. मुळात राष्ट्रवादीच फुटल्याने ताकद विखुरलीये, त्यात भरीत भर पाटलांसारखा तगडा उमेदवार मोठ्या पवारांच्या पाठिंब्यावर विरोधात असणार. मागे लोकसभेत त्यांचा शिव्यांचा व्हायरल व्हिडीओही प्रतिमेला तडा देणारा ठरलाय. शिवाय पवारांच्या उमेदवारांबद्दल लोकांना सहानुभूती आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीही लढाई कठीणच असेल. 

त्यामुळे कोणी कितीही खात्री दिली तरी इंदापूरचे लढाई एकतर्फी होणार नाही. तगडे उमेदवार आणि पवार विरुद्ध पवार पार्श्वभूमी असल्याने इथे जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद साऱ्याचा वापर होईल आणि म्हणूनच ही लढत जास्त इंटरेस्टिंग होईल. विशेष म्हणजे शरद पवारांनी ज्यांना आजवर विरोध केला, निवडणुकांमध्ये धूळ चारली.. त्यांच्यासाठीच आता ते विधानसभेचं दार उघडणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.