Maharashtra Politics : झेंडावंदनाच्या यादीवरून राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित पवार कोल्हापूरला जाणार नाहीत?

independence day 2023  flag hoisting list  NCP leader Ajit Pawar Dada bhuse chhagan bhujbal upset over guardian minister post
independence day 2023 flag hoisting list NCP leader Ajit Pawar Dada bhuse chhagan bhujbal upset over guardian minister post
Updated on

देशाचा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यांच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारे झेंडावदन कोण करावे यावरून राजकारण सुरू झालं आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला पण पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नसल्याने झेंडावंदन कोण करावे यावरून वाद टाळण्यासाठी राज्य सरकारकडून याबाबत यादी जाहीर केली आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आङेत.

राज्य सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मंत्री अदिती तटकरे या पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत. तर रायगड येथे जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन करणार आहेत.

मात्र यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाशिक तर अजित पवार यांच्याकडून पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी दावा करण्यात आला होता. मात्र, वाद टाळण्यासाठी सरकारच्या वतीने झेंडावंदनाची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्याला हव्या असलेल्या जिल्ह्यात झेंडावंदन करता येत नसल्याने या कार्यक्रमांना मंत्री गैरहजर राहणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

independence day 2023  flag hoisting list  NCP leader Ajit Pawar Dada bhuse chhagan bhujbal upset over guardian minister post
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

त्यामुळे आता ध्वजारोहणाच्या मंत्र्याच्या जबाबदारीत बदल होण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्ट रोजी अमरावतीत छगन भुजबळ यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील हे ध्वजवंदन करतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापुरला झेंडावंदन करणार नाहीत, तर ते ध्वजारोहनासाठी मुंबईत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय शिवसेना नेते दादा भुसे हे सध्या नाशिकचे पालकमंत्री असून यादीत मात्र त्यांना धुळ्यात झेंदावंदन करणार असल्याचा उल्लेख आहे, त्यामुळे दादा भुसे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे झेंदावंदनाच्या यादीत बदल होऊन नवी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

independence day 2023  flag hoisting list  NCP leader Ajit Pawar Dada bhuse chhagan bhujbal upset over guardian minister post
Jitendra Awhad On CM Shinde : "...असं पुन्हा कधीही करू नका"; आव्हाडांचा CM शिंदेंना प्रेमाचा सल्ला

सरकारकडून जाहीर झालेली यादी

देवेंद्र फडणवीस - नागपूर

अजित पवार - कोल्हापूर

छगन भुजबळ - अमरावती

सुनील मुनगंटीवार - चंद्रपूर

चंद्रकांत पाटील - पुणे

दिलीप वळसे पाटील - वाशिम

राधाकृष्ण विखे पाटील - नगर

गिरीश महाजन - नाशिक

दादा भूसे - धुळे

गुलाबराव पाटील - जळगाव

रवींद्र चव्हाण - ठाणे

हसन मुश्रीफ - सोलापूर

दीपक केसरकर - सिंधूदूर्ग

उदय सावंत - रत्नागिरी

अतूल सावे - परभणी

संदीपान भुमरे, - औरंगाबाद

सुरेश खाडे - सांगली

विजयकुमार गावित - नंदूरबार

तानाजी सावंत - उस्मानाबाद

शंभूराजे देसाई - सातारा

अब्दुल सत्तार - जालना

संजय राठोड - यवतमाळ

धनंजय मुंडे - बीड

धर्मराव अत्राम - गडचिरोली

मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

संजय बनसोडे - लातूर

अनिल पाटील - बुलडाणा

अदिती तटकरे - पालघर

रायगड - जिल्हाधिकारी

हिंगोली - जिल्हाधिकारी

वर्धा - जिल्हाधिकारी

गोंदिया - जिल्हाधिकारी

भंडारा - जिल्हाधिकारी

अकोला - जिल्हाधिकारी

नांदेड -जिल्हाधिकारी

विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.