Independence Day: जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तीन शिक्षकांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

Indian Flag: शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख या बाहेरगावी गेल्याने शाळेतील राष्ट्रध्वज दिवसभर बेवारस स्थितीत होता. संध्याकाळचे ६:४० वाजले तरी राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला नाही. शिवाय त्याठिकाणी शाळेच्या महिला शिक्षिका हजर नसल्याची माहिती काही व्यक्तींना मिळाली.
Independence Day: जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तीन शिक्षकांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?
Updated on

बार्शिटाकळीः शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे ७८ व्या स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी पार पडला. शाळेतील तिन्ही शिक्षिकांपैकी एकही महिला शिक्षिका राष्ट्रध्वजाच्या देखरेखीसाठी शाळेत न थांबता सर्व नियम धाब्यावर बसवून शाळेच्या वर्गखोल्यांना कुलूप लावून अकोला येथे निघून गेल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख या बाहेरगावी गेल्याने शाळेतील राष्ट्रध्वज दिवसभर बेवारस स्थितीत होता. संध्याकाळचे ६:४० वाजले तरी राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला नाही. शिवाय त्याठिकाणी शाळेच्या महिला शिक्षिका हजर नसल्याची माहिती काही व्यक्तींना मिळाली. हा प्रकार तहसिलदार राजेश वझीरे, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे व शिक्षण विस्तार अधिकारी संदिप मालवे यांना दिली. त्यांनी एका शिक्षिकेला फोन लावला. रात्री ७:३० वाजता धोत्रे व काळणे नामक दोन महिला शिक्षिका हजर झाल्या. त्यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज उतरवण्यात आला.

Independence Day: जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तीन शिक्षकांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat: 'विनेशने जीव गमावला असता...', फायनलच्या आदल्या रात्री काय झालेलं? कोचकडून खळबळजनक खुलासा

याप्रकरणाची गंभीर दखल घेत बार्शिटाकळी पोलीसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत लेखी जबाब नोंदवण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या विरूध्द नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे तिन्ही शिक्षिकांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्याविरूध्द राष्ट्रध्वज अवमान झाल्याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे अशी माहिती संदीप मालवे, शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.बार्शिटाकळी यांनी दिली.

Independence Day: जिल्हा परिषदेच्या शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तीन शिक्षकांवर गुन्हा, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi Season 5 : "वाघिणीने ठार केलं त्यांना" ; एकट्या योगिताने दिली निक्की आणि जान्हवीला धोबीपछाड

पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सांगितलं की, राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी भांदवि कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.