मुंबई: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतही स्वातंत्र्यदिनाची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी ध्वजवंदन आणि परेड काढण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मंदिरेही देशभक्तीच्या रंगात रंगलेली पाहायला मिळाली. 15 ऑगस्टला मुंबईतील मंदिरेही खास पद्धतीने सजवण्यात आली आहेत. स्वातंत्र्यदिनी मुंबईतही तिरंगा यात्रा काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. तिरंगा रॅलीदरम्यान बाजारपेठांमध्ये भारत मातेच्या जयजयकाराचे निनाद ऐकू येत होते. प्रत्येकजण देशभक्तीच्या रंगात दिसत होता.