Nana Patole : 'राम मंदिराचं श्रेय राजीव गांधींना', इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने उचलला मुद्दा

nana patole
nana patolesakal media
Updated on

मुंबईः मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज दि. ३१ ऑगस्ट आणि उद्या दि. १ सप्टेंबर रोजी ही बैठक संपन्न होईल. या बैठकीपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला.

नाना पटोले म्हणाले की, इंडिया आघाडीतील आम्ही सहकारी भारत देश वाचवायला निघालेलो आहोत. मोदींचं लांगुलचालन करण्याशिवाय एनडीएतील पक्षांना पर्याय नाही. मणिपूरच्या घटनेचं हे लोक समर्थन करत आहेत. माता-भगिनींची अब्रू वाचवण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. चीनने नकाशा दाखवला तरी केंद्राची पावलं उचलण्याची हिंमत होत नाहीये.

nana patole
INDIA Mumbai Meeting: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला; दीपक केसरकर यांची टीका

पटोले पुढे म्हणाले की, 'चांद्रयान ३'चा डेटा मागवून घ्या. नरेंद्र मोदींचं भाषण लोक किती ऐकत होते, ते कळेल. आज देशाचा तिरंगा अडचणीत आलेला आहे. त्यासाठी इंडियाची एकजूट आहे. जुडेगा भारत और जुटेगा इंडिया या स्लोगनला धरुन आघाडीचं काम सुरु आहे.

''इतर बॅनरबाजी करण्यापेक्षा पार्टी विथ डिफरन्सचे बॅनर्स लावा. भाजपला लोकशाही मान्य नाही म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. सध्या महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही त्यांच्या शेतावर जायला कोणी तयार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली असताना बेरोजगारांनाच लुटण्याचं काम सरकार करीत आहे. हे दुर्दैवी आहे. एवढे प्रश्न समोर असताना सत्ताधारी लोक विरोधकांवर टीका करण्यात ते वेळ घावलवत आहेत.''

nana patole
Sharad Pawar: पुन्हा एकदा शरद पवार गट अ‍ॅक्शन मोडमध्ये! आता 'या' राज्यावर लक्ष करणार केंद्रित

राम मंदिराच्या मुद्द्यावर काय म्हणाले पटोले?

काँग्रेसने कधीही राम मंदिराचा विरोध केलेला नाही. तरीही चुकीची माहिती लोकांना दिली जात आहे. राजीव गांधींनीच राम मंदिराचे दरवाजे उघडले होते. राम मंदिराचा मुद्दा घेऊन पापं लपवू नका, हा त्यांना सल्ला आहे.

''भारतमातेला वाचवणं हा काँग्रेसचा मूळ उद्देश आहे. आघाडीत कुणाला कोणतं पद द्यायचं हा अधिकार संपूर्ण आघाडीतील पक्षांचा आहे. त्यामुळे कुणावर जबाबदारी देण्याचा मोठा मुद्दा नाहीये. सरकारने सध्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं'', असं पटोलेंनी स्पष्ट केलं.

एनडीएच्या बैठकीवरुन नाना पटोलेंना विचारलं असता, ते म्हणाले की सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते पाठोपाठ बैठका घेत आहेत. यापूर्वी एनडीए कुठं होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.